मुंबई बंगळूर हायवेवरून जाणाऱ्या टेम्पोचा अपघात; कोणीही जखमी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 11:56 IST2024-04-01T11:51:26+5:302024-04-01T11:56:17+5:30

अपघाताची माहिती भारती विदयापीठ वाहतूक विभागाला मिळताच क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले

Tempo accident near Jambhulwadi Dari Bridge No one was injured | मुंबई बंगळूर हायवेवरून जाणाऱ्या टेम्पोचा अपघात; कोणीही जखमी नाही

मुंबई बंगळूर हायवेवरून जाणाऱ्या टेम्पोचा अपघात; कोणीही जखमी नाही

कात्रज: मुंबई बंगळूर हायवेवरून जाणाऱ्या दूध वाहतूक टेम्पोचा अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ च्या दरम्यान जांभूळवाडी दरी पुलाजवळ घडली.

 वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहन डिव्हायडरला धडकले व अपघात झाला. दोघे जण वाहनामध्ये होते या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती भारती विदयापीठ वाहतूक विभागाला मिळताच क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले व वाहतूक सुरळीत केली. ही कामगिरी पोलिस निरीक्षक विजय तिकोळे यांच्या मार्गदर्शना नुसार पोलिस उपनरीक्षक अविनाश शिंदे पोलीस हवालदार  कुलाळ, पोलीस नाईक कुडले, पोलीस शिपाई कसबे, पोलीस शिपाई चोरमले यांनी केली.

Web Title: Tempo accident near Jambhulwadi Dari Bridge No one was injured