शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कामातून शिक्षकांना सवलत मिळावी

By admin | Updated: January 25, 2017 01:39 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामांमधून महिला, अपंग शिक्षक व बी. एल. ओ. कर्मचाऱ्यांना वगळण्यात

निमोणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कामांमधून महिला, अपंग शिक्षक व बी. एल. ओ. कर्मचाऱ्यांना वगळण्यात यावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचारी म्हणून प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नेमणूक केली जाते. या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या याद्या संबंधित शाळांकडून मागविण्यात आल्या आहेत. मात्र या कामासाठी महिला व अपंग शिक्षक यांची नेमणूक केल्यास मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते.कामाचा अतिरिक्त ताण येतो. याशिवाय अनेक शिक्षक व कर्मचारी वर्षभर बीएलओ म्हणून निवडणुकीचेच काम करीत असतो. त्यामुळे या निवडणुकांमधून महिला शिक्षिका, अपंग शिक्षक यांना निवडणुकीसाठी आदेश देऊ नये, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघटनांनीकेली आहे. या आशयाचे निवेदन शिरूरचे तहसीलदार पोळ यांना निवेदन दिले आहे. या वेळी शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब लांडगे, उपाध्यक्ष दीपक सरोदे, अखिल संघटनेचे अध्यक्ष शिवाजी वाळके, शिक्षकनेते अनिल महाजन उपस्थित होते.(वार्ताहर)