Teacher beat student who showed homework doing by sisters | बहिणीकडून गृहपाठ करून घेतल्याने शिक्षिकेची विद्यार्थ्याला काठीने मारहाण 
बहिणीकडून गृहपाठ करून घेतल्याने शिक्षिकेची विद्यार्थ्याला काठीने मारहाण 

पुणे : स्वत: गृहपाठ न करता बहिणीकडून करून घेतल्याच्या कारणावरून खासगी क्लास चालवणाऱ्या शिक्षिकेने मुलाला  मारहाण केली. याप्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना सायंकाळी सातच्या सुमारास देहूरोड बाजार येथे घडली.


देहूरोडपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाझवीन परवेझ शेख (रा. देहूरोड बाजार, देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे. पीडित मुलाची आई छाया तरुणसिंग (वय ४०, रा. बारलोटानगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे.  छाया यांचा मुलगा चैतन्य तरुणसिंग (वय १०) हा एका इंग्रजी शाळेतील चौथीच्या वर्गात शिकतो. त्याचा आणखी चांगला अभ्यास व्हावा, यासाठी मागील दीड महिन्यापूर्वी त्याला आरोपी शिक्षिका शेख यांच्या खासगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. शनिवारी नेहमीप्रमाणे चैतन्य क्लासला गेला. क्लासमध्ये चैतन्यने त्याचा गृहपाठ शिक्षिका शेख यांना दाखविला. मात्र, हा गृहपाठ चैतन्यने न करता बहिणीकडून लिहून आणला होता. बहिणीकडून गृहपाठ का करून आणला, अशी विचारणा करून शेख यांनी  काठीने बेदम मारहाण केली. याविषयी देहू रोड पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: Teacher beat student who showed homework doing by sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.