शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:08 IST

दत्तात्रय भरणे : निमसाखर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर वालचंदनगर : आजची लहान मुलेही उद्याच्या बलशाही भारताचे नेतृत्व असल्याने ...

दत्तात्रय भरणे : निमसाखर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वालचंदनगर : आजची लहान मुलेही उद्याच्या बलशाही भारताचे नेतृत्व असल्याने आजच्या मुलांना सुदृढ सक्षम आणि बळकट बनवण्यासाठी पौष्टिक आणि सकस आहाराची नितांत गरज आहे. भारत महासत्ता होण्याचे स्वप्न केवळ आजचे लहान मुलेच पूर्णत्वास नेऊ शकत असल्याने लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे ही केवळ शासनाची नाही तर प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे, असे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

निमसाखर (ता. इंदापूर) येथे खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ४३२ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. निमसाखरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजी पानसरे यांनी नीलकंठेश्वर, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घघाटन राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते झाले. शिबिरामध्ये रक्तातील साखर, रक्तदाब, नेत्रतपासणी करून ईसीजी काढण्यात आला. शिबिरामध्ये ४३२ नागरिकांची तपासणी झाली. यातील ३१ नागरिकांना मोतिबिंदू असल्याने त्यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, निमसाखरचे सरपंच धैर्यशील रणवरे, डॉ. ए. जी. रणवरे, भगवानराव रणसिंग, वीरसिंह रणसिंग, धनंजय रणवरे, शिवाजी पानसरे, नंदकुमार पानसरे, सुरेश लवटे उपस्थित होते. शिबिरामध्ये डॉ. योगेश पाटील, डॉ. केशव जायभाय, डॉ. गणेश पानसरे, डॉ. दीपा पानसरे, डॉ. मनीषा जायभाय यांनी रुग्णांची मोफत तपासणी केली. यावेळी निमसाखरमधील लहान मुलांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहाराचे वाटप करण्यात आले.

निमसाखर येथे लहान मुलांना पौष्टिक आहाराचे वाटप करताना राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व शिवाजी पानसरे.

१९०७२०२१-बारामती-०२