पुणे : महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाच्या मनाला चटका लावून जाणारी घटना आज सकाळी घडली आहे. महाराष्ट्राच्या धुरंधर व्यक्तिमत्व, सर्वांचे लाडके नेते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे बारामतीत विमानअपघातात निधन झाले. या अपघातातअजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचे लाडके नेते गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित दादांसोबत असणाऱ्या या ५ जणांची नावे आता समोर आली आहेत.
अजित पवारांचेविमान मुंबईवरून सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी टेक ऑफ झाले होते. तर बारामतीत ते ८ वाजून ५० मिनिटांनी लँडिंग होत असताना हा भीषण अपघात घडला. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं. त्यामध्ये अजितदादांसोबत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे व्हीएसआर या खासगी कंपनीचे विमान असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अजित दादा पवार साहेब, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाईट अटेंडंट यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Web Summary : A devastating plane crash in Baramati claimed the lives of Deputy Chief Minister Ajit Pawar and five others. The VSR private plane crashed while landing, killing Pawar, his PSO, pilots, and a flight attendant. The accident occurred en route to election rallies, plunging Maharashtra into mourning.
Web Summary : बारामती में एक विमान दुर्घटना में उपमुख्यमंत्री अजित पवार और पांच अन्य लोगों की मौत हो गई। वीएसआर का निजी विमान लैंडिंग के दौरान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें पवार, उनके पीएसओ, पायलट और एक फ्लाइट अटेंडेंट की मौत हो गई। दुर्घटना चुनावी रैलियों के रास्ते में हुई, जिससे महाराष्ट्र शोक में डूब गया।