शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

विजयस्तंभला आज प्रतिकात्मक मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा नजीक असलेल्या पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा नजीक असलेल्या पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना व अभिवादन दिन कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनासह इतर विभाग सज्ज झाले आहे. यावर्षी प्रतीकात्मक मानवंदना कार्यक्रम असूनही तो यशस्वी करण्याासाठी ३ हजार पेक्षा पोलीस फौजफाटा, आरोग्य पथक, जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. आज रात्री १२ वाजल्यापासुनच विजयस्तंभास मानवंदना व इतर कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.

कोरेगाव भिमा येथील १ जानेवारी २०२१ रोजीचे विजयरणस्तंभ अभिवादन कार्यक्रम जरी प्रतिकात्मक असला तरी याठिकाणी बंदोबस्ताचे पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडेकोट नियोजन करण्यात आलेले आहे. मानवंदना कार्यक्रमासाठी देशभरासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांबरोबरच विदर्भ, नागपुर, अमरावती, अकोला, यवतमाळ या भागातून जास्त प्रमाणात जनसमुदाय येतो. मुंबई, पिंपरी चिंचवड, भोसरी या भागातून व महाराष्ट्राबाहेरून देखील लोक येत असतात. कोरोनामुळे यावर्षी मानवंदनेसाठी पास सक्तीचे करण्यात आले आहे. ज्यांना पास असेल त्यांनाच मानवंदनेसाठी प्रवेश देण्यात येणास आहे. मानवंदनेसाठी येणाऱ्या अनुयायांनी सहकार्य करण्याचे आवाहन कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी केले.

विजयस्तंभास रात्री १२ वाजता सामुहीक बुध्द वंदना, १२ बाजुन एक मिनीटांनी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. सकाळी सहा वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व नितीन राऊत हे विजयस्तंभास मानवंदनेसाठी येणार आहेत. त्यानंतर समता सैनिक दलाच्या २५० जवानांची मानवंदना होणार आहे. भिमगितांचे कार्यक्रमही यावेळी होणार आहे. या संपुर्ण मानवंदना कार्यक्रमाचे दुरदर्शनसह इतर माध्यमांबरोबरच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने फेसबुक व युट्युबवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

पोलीस बंदोबस्त :-

अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी लोणीकंद आणि शिक्रापूर या पोलीस ठाण्यांच्या हद्यीत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. त्याकरीता ८ अपर पोलीस अधीक्षक, ३१ पोलीस उप विभागीय अधिकारी, ९६ पोलीस निरीक्षक, २२४ सहाय्यक पोलीस निरिक्षक / पोलीस उपनिरिक्षक, २ हजार ४१४ पोलीस कर्मचारी, ७२१ होमगार्ड, बीडीडीएस पथके तसेच पोलीस व्हॅलेटीयर अशा प्रकारे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

मोठी वाहने व साधनसामुग्री

पाचटनी वाहने, लाईट व्हॅन, सुमो / बलेरो, दुचाकी वाहने, व्हिडीओग्राफर, वॉकीटॉकी, एचएचएमडी, डीएफएमड़ी, दोर, पीए सीस्टम, बॅरीगेटस, सीसीटीव्ही कॅमेरे, बॉयनाक्युलर, बॅरीकेटींग साऊंड सिस्टीम, फायर रेसीस्टेंट बलुन्स, मंडप शामीयाना, तंबू टेन्ट नियंत्रण व्यवस्था, प्राथािक आरोग्य केंद्र, अ‍ॅम्बुलन्स, क्रेन, मोबाईल टॉयलेट व पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र मद्य निषेध अधिनियम, १९४९ मधील नियम १४२ अन्वये जिल्हाधिका-यांनी वाघोली, लोणीकंद, पेरणेफाटा (ता. हवेली), तसेच कोरेगाव भीमा, शिक्रापुर, (ता. शिरुर) या ग्रामपंचायत हद्दीतील व परिसरातील सर्व मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

चौकट

अशी असेल वाहतूक

नगरकडून येणारी सर्व जड वाहने शिक्रापूर येथील चाकण चौकातून

चाकणच्या दिशेने वळतील.

पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारी सर्व व्यावसायिक, खासगी,

प्रवासी वाहतूक करणारी जड वाहने बेरवडा- विश्रांतवाडी-आळंदी- चाकणमार्गे शिक्रापूर-नगर रोड अशी नगरच्या दिशेने जातील. पुण्याहुन नगरकडे जाण्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे येरवडा-खराडी बायपासमार्गे हडपसर-पुणे-सोलापूर रस्ता-केडगाव- चौफुला- न्हावरे-

शिरूर या मागनि पुढे नगर,

सोलापूर महामार्गावरून पुणे-नगर रस्त्याच्या दिशेने लोणीकंदकडे येणारी

सर्व वाहने हडपसर-मगरपट्टा- खराडी-बायपासमार्गे येरवडा- विश्रांतवाडी-

आळंदी- चाकणमार्गे पुन्हा शिक्रापूरकडून नगरच्या दिशेने जातील. आळंदीकडून पुणे-नगर महामार्गाकडे जाऊ इच्छिणारी सर्व वाहने

मरकळ-शेलपिंपळगाव ते शिक्रापूर या मार्गाने पुढे नगरकडे जातील. आळंदीकडून सोलापूर रस्त्याकडे जाणारी सर्व वाहने विश्रांतवाडी-

येरवडा-खराडी बायपास ते हडपसरमार्गे सोलापूरकडे जातील.

विजय रणरणस्तंभ अभिवादन पास १८०८ नागरिकांनी घेतले

लोणीकंद : विजय रणस्तंभ या वर्षी मानवंदना कार्यक्रम साठी जिल्हा प्रशासनाने पास पध्दत राबवत आहे. लोणीकंद पोलीस ठाण्ण्यातून सायंकाळी पर्यंत १८०८ नागरिकांना पास देण्यात आले. लोणीकंद पोलिस निरिक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शन खाली सहा अधिकाऱ्यांचे पथक पास देण्याची काम करत आहेत. संघटनेच्या नावाने पत्र, आधार कार्ड, फोटो आदी पुर्तंता केल्यावर तात्काळ पास दिले जात आहेत. सोलापूर, सांगली भागातील तर पिंपरी चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण भागातील बहुसंख्य कार्यकर्ते नी पास घेतले आहे. उद्या दिवसभर पास प्रक्रिया चालू राहणार आहे.

फोटो : कोरेगाव भीमा (ता.शिरुर) पेरणे फाटा असलेल्या ऐतिहासीक विजयस्तंभाची सजावट करताना