शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

मुलींकडून उत्तरपत्रिका तपासणारा शिक्षक निलंबित

By admin | Updated: March 24, 2015 00:24 IST

दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिका नववीतील विद्यार्थिनींकडून तपासून घेणाऱ्या शिक्षकावर शैक्षणिक संस्थेकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या हिंदी विषयाच्या उत्तरपत्रिका नववीतील विद्यार्थिनींकडून तपासून घेणाऱ्या शिक्षकावर शैक्षणिक संस्थेकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली असून, त्या संदर्भातील अहवाल आनंद विद्यालयाने शिक्षण अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. पुणे विभागीय शिक्षण मंडळाकडे अद्याप हा अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे मंडळातर्फे पुढील कार्यवाही केली जाणार आहे.विमाननगरमधील आनंद विद्यानिकेतन विद्यालयातील शिक्षक दशरथ बेल्हेकर यांनी दहावीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका नववीतील विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे उत्तरपत्रिकांच्या सुरक्षेबाबत आणि मूल्यांकनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यावर काही सामाजिक संघटनांकडून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली होती. दशरथ बेल्हेकर हे आनंद विद्यालयात हिंदी विषयाचे शिक्षक असून, या संस्थेचे आजीव सभासद आहेत. त्यांची या विद्यालयाच्या संस्थेवर विश्वस्त म्हणून नेमणूक झालेली आहे. त्यामुळे बेल्हेकर यांना या विद्यालयात स्वतंत्र कार्यालय देण्यात आले. परंतु, त्यांनी या कार्यालयात नववीच्या तीन विद्यार्थिनींकडून दहावीच्या हिंदीच्या उत्तरपत्रिका तपासून घेतल्या. यामुळे संस्थेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व संस्थेच्या सचिव किरण तावरे म्हणाल्या, की संस्थेने दशरथ बेल्हेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असून, विद्यालयाने याबाबतचा अहवाल शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे. शिक्षण अधिकारी उद्या विभागीय शिक्षण मंडळाकडे यासंदर्भातील अहवाल देणार आहेत.