शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
3
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
4
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
5
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
6
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
7
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
8
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
9
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
10
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
11
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
12
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
13
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
14
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
15
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
16
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
17
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
18
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
19
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
Daily Top 2Weekly Top 5

येवले यांचे तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन, ‘तशी’ सवय असलेल्या येवलेंवर राजकीय वरदहस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 09:13 IST

Suryakant Yewale News: बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या ताब्यातील सरकारी जमीन कुळांच्या नावे करण्याचा कारनामा करणाऱ्या निलंबित तहसीलदारांना अशा कामांची सवयच असल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले होते.

पुणे -  बोपोडी येथील कृषी महाविद्यालयाच्या ताब्यातील सरकारी जमीन कुळांच्या नावे करण्याचा कारनामा करणाऱ्या निलंबित तहसीलदारांना अशा कामांची सवयच असल्याचे पोलिसांनी एफआयआरमध्ये नमूद केले होते. त्याचाच प्रत्यय सध्या येत आहे. सूर्यकांत येवले नायब तहसीलदार म्हणून दाखल झाल्यानंतर तहसीलदार पदावर पोहोचेपर्यंत त्यांचे तब्बल चार वेळा निलंबन झाले आहे. गडचिरोली, माण खटाव (सातारा), इंदापूर (पुणे) व सध्या पुणे याठिकाणी त्यांना निलंबित केले होते.  त्यामुळे अशा अधिकाऱ्याला पुणे शहराचे तहसीलदारपद बहाल केले जाते आणि अशा प्रकारामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन बदनाम होते. यावरून अधिकाऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे, तर यामागे मोठा राजकीय  हातही असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एफआयआरमध्ये उल्लेखबोपोडी येथील सुमारे १३ एकर जमीन कृषी महाविद्यालयाच्या ताब्यात आहे. ही जमीन १९५५ मध्ये रीतसर कृषी महाविद्यालयाच्या मालकीची असल्याचे सातबारा उताऱ्यावरून स्पष्ट होत आहे. मात्र, सूर्यकांत येवले यांनी ही जमीन विद्वांस यांच्या अर्जानंतर कुळाच्या नावे केली.याच प्रकरणावरून जिल्हा प्रशासनाने येवले यांच्या विरोधात खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. या एफआयआरमध्ये येवले यांना अशा स्वरूपाचे कृत्य करण्याची सवयच असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी कशासाठी निलंबन झाले होते, याची माहिती दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Yeole: Four Suspensions, Political Favoritism Plague Pune's Revenue Officer

Web Summary : Revenue officer Suryakant Yeole, suspended four times, faces accusations of land irregularities. An FIR alleges habitual misconduct, specifically regarding agricultural land allocation. Despite a history of suspensions in Gadchiroli, Satara, and Pune, Yeole's position raises concerns of political influence and administrative integrity within Pune district.
टॅग्स :suspensionनिलंबनPuneपुणे