शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
2
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
3
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
4
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
5
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
6
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
7
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
8
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
9
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
10
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
11
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
12
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
13
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
14
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
15
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
16
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
17
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
18
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
19
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
20
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

धनदांडग्यांना सूट, सामान्यांवर बोजा

By admin | Updated: February 13, 2015 06:30 IST

डॉलरमध्ये पैसे कमावणाऱ्या आयटी कंपन्यांना व्यावसायिक कराऐवजी निवासी दराने आकारणी, मोठ्या थकबाकीदारांच्या वसुलीकडे दुर्लक्ष, प

पुणे : डॉलरमध्ये पैसे कमावणाऱ्या आयटी कंपन्यांना व्यावसायिक कराऐवजी निवासी दराने आकारणी, मोठ्या थकबाकीदारांच्या वसुलीकडे दुर्लक्ष, पर्यायी उत्पन्नाच्या मार्गांकडे दुर्लक्ष करून केवळ मिळकतकर, पाणीपट्टी वाढवून प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या सर्वसामान्य पुणेकरांवर कराचा बोजा टाकला जात असल्याची भावना गुरुवारी महापालिकेच्या मुख्य सभेत अनेक सभासदांनी व्यक्त केली. दरवाढीच्या प्रस्तावाला काँग्रेस, मनसे व शिवसेना यांनी कडाडून विरोध केला.आयुक्त कुणाल कुमार यांनी अंदाजपत्रकामध्ये सुचविलेल्या मिळकतकरामध्ये १८ टक्के वाढ स्थायी समितीने फेटाळून लावली होती. मागील वर्षीप्रमाणेच करआकारणी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये अचानक बदल करून मिळकतकरामध्ये १० टक्के, तर व्यावसायिक पाणीपट्टीमध्ये ५० टक्के वाढ करण्याची उपसूचना मांडण्यात आली. शहरातील ७०० आयटी कंपन्यांना व्यावसायिक दराऐवजी निवासी दराने मिळकतकर आकारणी केली जात आहे. त्यांना आॅगस्ट २०१४पर्यंतच त्याबाबतची सवलत देण्यात आली होती. मात्र, मुदत उलटून गेल्यानंतरही त्यांची सवलत सुरू आहे. त्यामुळे या ७०० आयटी कंपन्यांना व्यावसायिक दराने मिळकत कराची आकारणी करण्यात यावी अशी उपसूचना मांडण्यात आली. काँग्रेस व शिवसेनेने याला पाठिंबा दिला. सर्वसामान्य नागरिकांकडून कर थकला, तर त्यांना शास्तीकर लावून त्यावर चक्रवाढ दराने आकारणी होते; मात्र दुसरीकडे आयटी कंपन्यांना करातून मोठी सवलत देण्यात आली आहे, याकडे उपमहापौर आबा बागुल यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शहरामध्ये आयटी कंपन्या याव्यात म्हणून राज्य शासनाच्या सूचनेनुसार ही सवलत देण्यात येत असल्याचे स्पष्ट करून ही सवलत पूर्ववत ठेवण्याचे सभागृह नेते सुभाष जगताप यांनी समर्थन केले. शहरामध्ये एक हजार कोटींची मिळकतकराची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता या वेळी व्यक्त करण्यात आली.