भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक आग; मोठे नुकसान, एक ट्रक जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:56 IST2026-03-30T16:55:55+5:302026-03-30T16:56:49+5:30
आगीमुळे बगॅसचे मोठे नुकसान झाले असून या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही

भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक आग; मोठे नुकसान, एक ट्रक जळून खाक
पाटस : पाटस (ता. दौंड ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक लागलेल्या आगीमुळे बगॅसचे मोठे नुकसान झाले मात्र या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान एक ट्रक आगीत जळून खाक झाला आहे. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाली नाही.
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कारखाना परिसरात ठेवलेल्या बगॅसला आग लागली हवेचे प्रमाण असल्यामुळे दरम्यान आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात फोफावत होते. आग लागली असल्याचे समजतात आग विझविण्यासाठी कारखान्याच्या कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील चार अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुपारनंतर आग आटोक्यात आली होती आटोक्यात आली होती. बगॅस भरण्यासाठी एक ट्रक उभा होता बगॅसला आग लागल्यानंतर आगीचे लोळ ट्रकवर आल्याने ट्रक जळून खाक झाला. घटनास्थळी पाटस पोलीस चौकीच्या पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली.