शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी केले वाहतूक नियमांचे जनजागरण

By admin | Updated: October 7, 2016 03:32 IST

पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी आयोजित केलेल्या ‘वाहतूक जनजागृती दिवसा’च्या उपक्रमाला समाजाच्या विविध स्तरांमधून उत्तम प्रतिसाद

पुणे : पुणे शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेने गुरुवारी आयोजित केलेल्या ‘वाहतूक जनजागृती दिवसा’च्या उपक्रमाला समाजाच्या विविध स्तरांमधून उत्तम प्रतिसाद मिळाला. पोलिसांनी वाहतूक सुधारणेसाठी टाकलेल्या अभिनव पावलाला प्रतिसाद देत तब्बल सव्वाचार लाख पुणेकर, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह स्वयंसेवकांनी तब्बल शंभर किलोमीटरची मानवी साखळी करून ‘आपली सुरक्षा आपल्या हाती’ असा संदेश दिला. शहरात एक प्रकारचे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.शहरातील २७० शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी एकत्र येऊन मानवी साखळी करीत वाहतूक नियमांचे पालन करण्याची शपथ घेतली. डेक्कन येथील खंडूजीबाबा चौकात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मंचावर महापौर प्रशांत जगताप, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, महापालिका आयुक्त कु णाल कुमार, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, उपमहानिरीक्षक तरवडे, उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, विश्वजित कदम, सुधीर हिरेमठ, डॉ. बसवराज तेली, पंकज डहाणे, कल्पना बारवकर, गणेश शिंदे, शेषराव सूर्यवंशी, बाल सिने अभिनेत्री गौरी गाडगीळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, लायन्स क्लबच्या जिल्हा गव्हर्नर चंद्रहास शेट्टी, आशा ओसवाल, नंदा पंडित, पोलीस निरीक्षक क्रांती पवार उपस्थित होत्या. या वेळी महापौर जगताप यांनी नागरिकांना वाहतूक नियमपालनाची शपथ दिली. या वेळी सर्वांनी मंचावरून खाली उतरून मोटारी, रिक्षा, दुचाकींना वाहतुकीच्या नियमपालनाचे आवाहन करणारे स्टिकर चिकटवले. वाहनचालकांना सुरक्षित वाहन चालवून मानवी जीविताचे रक्षण करण्याचे तसेच नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमस्थळावर निखिल शिंदे यांनी संदेशात्मक रांगोळी काढली होती. पोलीस निरीक्षक स्मिता जाधव, असावरी गायकवाड, अक्षय गोळवे यांनी सूत्रसंचालन केले. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये वाहतूक पोलिसांनी या उपक्रमासाठी जोरदार तयारी केली होती. मराठी सिनेकलाकारांनीही या उपक्रमासाठी नियम पालन करण्याचे आवाहन करणारे व्हिडीओ वाहतूक शाखेला दिले होते. यासोबतच प्रसिद्ध व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनीही वाहनापेक्षा मानवी जीवन अमूल्य असल्याचा संदेश आपल्या कुंचल्यामधून दिला. (प्रतिनिधी)शहरातील वाहतूककोंडीची तीव्रता सर्वांना जाणवते. सर्व वाहनचालक वाहतूक पोलिसांना दूषणे देत असतात; परंतु वाहतूक सुधारणा ही आपलीही जबाबदारी आहे, असा विचार आपण करीत नाही. पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमामधून एक नवे आंदोलन उभे राहील. एक दिवस पुण्याचे ५० लाख नागरिक यामध्ये नक्की सहभागी होतील. या स्मार्ट शहराची वाहतूकही स्मार्ट होईल. - सौरभ राव, जिल्हाधिकारी