शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! ससूनच्या डॉक्टरांनी बिल्डर बाळाचे रक्ताचे नमुने बदलले; दोघांना अटक
2
"तुला मिळणार नाही, मोठ्याला घेऊन ये"; पुण्यात अचानक दारु विक्रीचे 'नियम' लागू झाले
3
भीषण! इस्रायलने राफामध्ये केला एअर स्ट्राईक; 35 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
४ जूनला मतमोजणी, १ जूनला इंडिया आघाडीची मोठी बैठक; केजरीवाल, स्टॅलिन यांना निमंत्रण
5
मालेगावच्या माजी महापौरांवर मध्यरात्री गोळीबार; हॉटेलमध्ये तीन गोळ्या झाडल्या, अब्दुल मलिक जखमी
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला
7
"भारतात आजही सावरकरांचे विचार लागू..."; रणदीप हूडाने मनातली भावना स्पष्टच सांगितली
8
डावखरेंचा पत्ता कापला? भाजपला पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधान परिषदेसाठी उमेदवार उतरवला
9
गुरु रंधावा-शहनाज गीलच्या डेटिंगचं सत्य आलं समोर; गायकाने केला खुलासा, म्हणाला, 'मी डेट करायला सुरुवात...'
10
आजचे राशीभविष्य: भागीदारीत लाभ, प्रतिस्पर्ध्यांवर मात; हातून सत्कार्य घडेल, भाग्याचा दिवस
11
जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका
12
मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ: घटलेल्या मतदानाचा नेमका फटका कोणाला बसणार?
13
JioCinema चा आणखी एक धमाका! अवाक् करणाऱ्या किंमतीत मिळणार प्रीमिअम ॲन्युअल प्लॅन, पाहा डिटेल्स
14
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ: अंधेरी पश्चिममधील मतदान महत्त्वाचे ठरणार!
15
६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!
16
मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघ: कमी मतदानामुळे संभ्रमाची स्थिती, नक्की काय होणार?
17
ठाण्यात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, बाहेर पडण्यासाठी मार्ग अपुरा; गेमिंग झोनमध्ये तुटपुंजी अग्निरोधक यंत्रणा
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण: आरोपी भावेश भिंडेच्या कोठडीत चार दिवसांची वाढ
19
सायन हॉस्पिटल अपघात प्रकरण: चौकशीनंतर दोषींवर होणार कठोर कारवाई- अतिरिक्त आयुक्त
20
विशेष लेख: असह्य उन्हाळ्याचा आता मेंदूवरही परिणाम! दाहाचे संकट केवळ ‘गार वाटण्या’ने सुटणारे नाही

मोशीत विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत डांबून ठेवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2019 2:48 PM

हाताने तसेच काठीने त्याच्या पाठीवर मारले, एवढेच नव्हे तर शाळा सुटल्यानंतरसुद्धा शंकरला थांबवले. त्याला वर्ग खोलीत डांबुन ठेवले.

पिंपरी : आपल्या गैरहजेरीत नक्कल करतो, आपल्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये कमेंट करतो, असा गैरसमज झालेल्या शिक्षकाने अल्पवयीन मुलाला हात व  काठीने बेदम मारहाण केली. ही घटना मोशी येथील बोऱ्हाडेवाडीच्या नुतन महापालिका प्रशाळेत बुधवारी घडली. मारहाण करुन समाधान न झाल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला वर्ग खोलीत डांबुन ठेवण्याची शिक्षा दिली. शिक्षकाच्या या कृतीबद्दल संतापलेल्या पालकांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोऱ्हाडेवाडी येथील महापालिका शाळेत शिकणाऱ्या शंकर नावाच्या मुलाबाबत ही घटना घडली. आठवीतील शंकरचे हिंदी विषयाचे शिक्षक कळसाईत सर यांनी त्याला अघोरी प्रकारची शिक्षा दिली. शंकर हा मुलांमध्ये आपली नक्कल करून दाखवतो. आपल्याविषयी कमेंट करतो. असा त्यांचा गैरसमज झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात शिक्षकाने शंकरला अघोरी शिक्षा दिली. हाताने तसेच काठीने त्याच्या पाठीवर मारले, एवढेच नव्हे तर शाळा सुटल्यानंतरसुद्धा शंकरला थांबवले. त्याला वर्ग खोलीत डांबुन ठेवले. बबिता महादेव खोचरे यांनी शिक्षकाविरूद्ध फिर्याद दाखल केली आहे. शिक्षकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस