Join us  

जान्हवी कपूरने शेअर केला हिंदी मालिकेचा प्रोमो, ऋतुजा बागवेची आहे मुख्य भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 9:12 AM

जान्हवीने ऋतुजाच्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्याचं कारण काय?

अभिनेत्री जान्हवी कपूरचा (Janhvi Kapoor) चाहतावर्ग मोठा आहे. सध्या ती आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाचं प्रमोशन करत आहे. राजकुमार रावसोबत तिची जोडी जमली आहे. दोघंही कधी वाराणसीला काशी विश्वनाथच्या दर्शनाला दिसले तर कधी आयपीएल सामन्यांसाठी त्यांनी स्टेडियमवर हजेरी लावली.  जान्हवीने नुकतंच एका हिंदी मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. बॉलिवूड अभिनेत्रीने हिंदी मालिकेचा प्रोमो शेअर करण्यामागे काय कारण आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला. 

जान्हवी कपूरच्या रिलेशनशिपचीही चांगलीच चर्चा असते. जान्हवी शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) डेट करत आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा तो नातू आहे. जान्हवीचं शिखरच्या कुटुंबासोबतही चांगलं नातं आहे. शिखरची आई स्मृती शिंदे पहाडिया (Smruti Pahariya) या आगामी 'माटी से बंधी डोर' मालिकेत दिसणार आहेत. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे मुख्य भूमिकेत आहे. जान्हवीने मालिकेचा प्रोमो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. 'काकू तुमचा मला खूप अभिमान वाटतो' असं कॅप्शन तिने दिलं आहे.

शिखर पहाडियानेही आईला शुभेच्छा देत मालिकेचा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जान्हवी आणि शिखर हे लव्हबर्ड्स कायम सोशल मीडियावर चर्चेत असतात. जान्हवीने अनेकदा 'शिखू' नावाचं पेंडंटही गळ्यात घातलं होतं.  'माटी से बंधी डोर' आजपासून स्टार प्लसवर संध्याकाळी 7.30 वाजता प्रसारित होणार आहे.

जान्हवी 'मिस्टर अँड मिसेस माही' शिवाय 'देवरा:पार्ट 1' सिनेमातही दिसणार आहे. तसंच करण जोहरच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या सिनेमात ती वरुण धवनसोबत झळकणार आहे.

टॅग्स :जान्हवी कपूरऋतुजा बागवेमराठी अभिनेताहिंदीटेलिव्हिजनसोशल मीडिया