Join us  

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, Adani Portsच्या शेअरमध्ये तेजी, Wipro घसरला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 9:45 AM

Opening Bell Today: चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 75688 अंकांवर उघडला.

Opening Bell Today: चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराचं कामकाज तेजीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 75688 अंकांवर तर निफ्टी 75 अंकांवर 23032 अंकांवर व्यवहार करत आहे. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या कामकाजात निफ्टीचे सर्व सेक्टोरल निर्देशांक तेजीसह कार्यरत होते.  

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात वाढ दर्शविणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्सबद्दल बोलायचं झाले तर यामध्ये डिव्हिज लॅब, अदानी पोर्ट्स, हिंडाल्को, एनटीपीसी, टाटा स्टील, टाटा कन्झ्युमर आणि जेएसडब्ल्यू स्टीलच्या शेअर्सचा समावेश होता, तर अदानी एंटरप्रायझेस, विप्रो, आयशर मोटर्स, ओएनजीसी, हिरो, महिंद्रा अँड महिंद्रा आणि कोल इंडियाच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. 

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती 

सोमवारी शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात गौतम अदानी समूहाच्या १० पैकी ९ लिस्टेड कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स जवळपास दोन टक्क्यांच्या घसरणीवर व्यवहार करत होते.  

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांच्या समभागांबाबत बोलायचे झाले तर इरकॉन इंटरनॅशनल, भारत इलेक्ट्रॉनिक्स, इंजिनीअर्स इंडिया, एचडीएफसी बँक, टीसीएस, लार्सन, एचसीएल टेक आणि कोटक महिंद्रा बँक यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स, ओएनजीसी आणि विप्रो या कंपन्यांच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली. 

प्री-ओपन मार्केटमध्ये बीएसई सेन्सेक्स 234 अंकांच्या वाढीसह 75644 अंकांवर व्यवहार करत होता, तर निफ्टी 92 अंकांच्या वाढीसह 23049 अंकांवर व्यवहार करत होता.

टॅग्स :शेअर बाजार