शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना जून ठरेल शानदार, नवीन ओळख फायदेशीर; सुवर्ण संधी, सुखाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 7:07 AM

1 / 11
ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिना अनेकार्थाने शुभ-फलदायी, विविध शुभ योगांचा, अद्भूत राजयोगांचा ठरला. तसेच आता जून महिन्यात काही ग्रहांचे गोचर तर काही ग्रहांचा चलनबदल होणार आहे. ग्रह नियोजित कालावधीनंतर, नियमित अंतराने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत असतात. ग्रह गोचराच्या दृष्टिने जून महिना महत्त्वाचा मानला गेला आहे.
2 / 11
१ जून रोजी नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीत म्हणजेच मेष राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर, १२ जून रोजी शुक्र ग्रह स्वराशीतून म्हणजे वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह जून महिन्यात दोनदा राशीपरिवर्तन करणार आहे. १४ जून रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल, तर २९ जून रोजी मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करेल.
3 / 11
नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य १५ जून रोजी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याच्या राशीसंक्रमणाला संक्रांती म्हटले जाते. त्यामुळे सूर्याच्या मिथुन राशीतील काळ मिथुन संक्रांती म्हणून ओळखला जाईल. जून महिन्याची सांगता होताना नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत वक्री होणार आहे.
4 / 11
तर युरेनस वृषभ राशीत प्रवेश करेल. नवग्रहांपैकी प्रमुख ग्रहांच्या गोचराचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या राशींवर जून महिन्यातील ग्रह गोचराचा कसा प्रभाव असू शकेल? ते जाणून घेऊया...
5 / 11
मेष: आगामी काळ फायदेशीर ठरू शकेल. अनेक प्रकारच्या चांगल्या बातम्या मिळू शकतात. अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतील. कामाच्या ठिकाणी यश मिळेल. योजना पूर्ण होऊ शकतील. आत्मविश्वास वाढेल. करिअर आणि बिझनेसमध्ये चांगली बातमी मिळू शकतील. समाजात मान-सन्मान वाढेल.
6 / 11
वृषभ: जीवनात महत्त्वाचे बदल दिसून येतील. काही मोठी कामे पूर्ण होऊ शकतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. प्रभावशाली लोकांची भेट होण्याची शक्यता आहे. घरात काही शुभ कार्याचे आयोजन केले असेल, तर तुम्ही त्यात व्यस्त राहू शकता. नोकरदार लोकांसाठी जून महिना आणि ग्रहांच्या राशी बदलामुळे त्यांचे करिअर मजबूत होईल. नोकरीत बढती आणि पगार वाढण्याची शक्यता आहे. काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल.
7 / 11
सिंह: शुभ आणि लाभदायक ठरू शकेल. अनेक सुवर्ण आणि चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाच्या संधी मिळतील. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. भौतिक सुखसोयींचा आनंद घ्याल. ग्रहांची शुभ दृष्टी पडेल ज्यामुळे त्यांच्या सर्व योजना सफल होऊ शकतील. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात सौहार्दपूर्ण संबंध राहतील. ग्रहांचे पाठबळ सकारात्मक परिणाम देतील.
8 / 11
कन्या: लाभाच्या संधींमध्ये वाढ होऊ शकेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकेल. पगार वाढीचे योग येऊ शकतील. आर्थिक बाजू मजबूत राहू शकेल. वाहन व मालमत्ता खरेदीची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.
9 / 11
तूळ: वैभव आणि समृद्धी प्राप्त होण्याची शक्यता आहे. आनंद द्विगुणित होऊ शकेल. मानसिक शांतता मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी मिळून बँक बॅलन्स वाढण्याची शक्यता आहे. ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात यश मिळेल. इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील राहाल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन चांगले राहील. सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील.
10 / 11
धनु: आर्थिक लाभाच्या संधी मिळू शकतील. व्यवसायात चांगला नफा आणि मोठा फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांना चांगली ऑफर मिळू शकते. ज्यामुळे प्रोफाइल वाढू शकेल. नशिबाची साथ लाभेल. मन प्रसन्न करणाऱ्या काही गोष्टी घडून येऊ शकतील.
11 / 11
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य