शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील चित्रफीत काढणा-यास अटक

By admin | Updated: March 14, 2015 06:20 IST

संगणक अभियंता तरुणीच्या मित्राने तिची अश्लील चित्रफीत तयार करून फेसबुक तसेच व्हॉट्स अ‍ॅपवर ती टाकली. तसेच तरुणीला बदनामीची धमकी देऊन

पुणे : संगणक अभियंता तरुणीच्या मित्राने तिची अश्लील चित्रफीत तयार करून फेसबुक तसेच व्हॉट्स अ‍ॅपवर ती टाकली. तसेच तरुणीला बदनामीची धमकी देऊन दोन लाखांची खंडणी मागितली. तरुणीने यासंदर्भात पोलीस आयुक्तांकडे तक्रार केल्यानंंतर गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सायबर शाखेच्या मदतीने आरोपीला जेरबंद केले. त्याच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला आहे. गिरीश श्याम सुगंध (वय ३५, रा. शांतीनगर, नागपूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी वानवडी भागात राहण्यास आहे. ती मगरपट्टा येथील संगणक कंपनीत नोकरी करते. तिचे वानवडी भागात आईस्क्रीम पार्लर आहे. या आईस्क्रीम पार्लरमध्ये आरोपी व्यवस्थापक म्हणून काम करीत होता. या तरुणीशी झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत त्याने तिची अश्लील चित्रफीत काढली. दरम्यान, आरोपी एक दिवस दारू पिऊन दुकानावर आल्यामुळे तिने त्याच्या कानाखाली मारली होती. तसेच त्याला नोकरीवरून काढले होते. त्यामुळे चिडलेल्या गिरीशने ही चित्रफीत मित्रांना व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवली. तसेच फेसबुकवरही टाकली. याबाबत तिने त्याला विचारणा केल्यावर त्याने ही चित्रफीत फेसबुकवरून काढली. ती पुन्हा फेसबुकवर टाकण्याची धमकी द्यायला त्याने सुरुवात केली होती. तिच्याकडे वारंवार दोन लाख रुपयांची मागणी तो करू लागल्यावर पीडित मुलीने पोलीस आयुक्त सतीश माथूर यांच्याकडे तक्रार केली. त्यांच्या सूचनांनुसार खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सायबर शाखेच्या सहायक निरीक्षक सीमा साठे यांनी आरोपीबाबत माहिती गोळा करायला सुरुवात केली. दरम्यान, तो पीडित मुलीला सारखे दिल्ली, मनमाड, लोणावळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी पैसे घेऊन बोलावीत होता. पीडित मुलीने त्याला आपल्याला लांब येणे शक्य नसल्याचे सांगून पुण्याला बोलावले. तो पुणे रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळताच निरीक्षक अनिल पाटील यांनी उपनिरीक्षक मारुती भुजबळ, प्रशांत पवार, संजय काळोखे, गणेश माळी, प्रमोद मगर, सचिन अहिवळे, रमेश गरुड, सिद्धार्थ लोखंडे, आनंद दळवी, हृषीकेश महल्ले यांनी सापळा लावला. स्टेशन परिसरात आलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. (प्रतिनिधी)