शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सहायक आयुक्तांवरील हल्ल्याचा इंदापूरमध्ये तीव्र निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:22 IST

इंदापूर : ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी ...

इंदापूर : ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी नगरपरिषदेसमोर हल्लेखोरांचा जाहीर निषेध करून एक दिवसीय काम बंद आंदोलन केले.

एकदिवसीय काम बंदमध्ये प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर, सभा अधीक्षक गजानन पुंडे, इंदापूर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मोहन शिंदे, कर निरीक्षक श्रद्धा वळवडे, पाणीपुरवठा पर्यवेक्षक सुरेश सोनवणे, नोडल ऑफिसर सुजय मखरे, सहायक आरोग्य निरीक्षक लिलाचंद पोळ, भागवत मखरे, सुनील लोहिरे, उद्यान निरीक्षक अशोक चिंचकर, अल्ताफ पठाण यांसह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना इंदापूर नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षीरसागर म्हणाल्या, ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना, एका माथेफिरूकडून त्यांच्यावर हल्ला झाला व यात त्यांची हाताची बोटे तुटली गेली. तसेच डोक्यास देखील मोठी जखम झाली. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या एका महिला अधिकाऱ्यावर झालेला हा भ्याड हल्ला अत्यंत संतापजनक आहे, याचा आम्ही जाहीर निषेध करतो.

गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्चीकरण होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच यावरील उपाय आहे, असे नगरपरिषदेच्या कर निरीक्षक श्रद्धा वळवडे यांनी सांगितले.

३१ इंदापूर

इंदापूर नगरपरिषदेसमोर निषेध करताना नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी.