शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
4
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
5
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
6
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
7
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
8
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
9
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
10
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
11
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
12
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
13
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
14
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
15
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
16
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
17
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
18
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
19
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
20
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही नीरा शहरात तणाव

By admin | Updated: August 25, 2015 04:28 IST

पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हजारो नागरिक आणि महिलांनी नीरा शहरातील प्रमुख बाजारपेठेतून मूक मोर्चा काढून पोलिसांकडे

नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात रविवारी सायंकाळी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ हजारो नागरिक आणि महिलांनी नीरा शहरातील प्रमुख बाजारपेठेतून मूक मोर्चा काढून पोलिसांकडे सर्व आरोपींच्या अटकेची मागणी केली. दरम्यान, नीरा शहरातील या घटनेच्या पार्श्वभूमीवर व्यापारीवर्गाने कडकडीत बंद पाळला. सोमवारी दिवसभर नीरा शहरात तणावाचे वातावरण होते. पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात माजी सरपंच राजेश काकडे, जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे, विद्यमान उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह आणखी तीन कार्यकर्त्यांवर बेकायदा जमाव करून नीरा शिवतक्रारमधील चव्हाण कुटुंबातील पृथ्वीराज चव्हाण, धर्मराज चव्हाण, अक्षय चव्हाण, विराज चव्हाण यांच्यासह आणखी सहा जणांनी हल्ला करून प्राणघातक हत्याराने वार करून त्यांना रविवारी गंभीर जखमी केले. निषेधार्थ नीरा शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. या मूक मोर्चामध्ये शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, प्रमोद काकडे, सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष काँग्रेसचे युवा नेते संजय जगताप, उपाध्यक्ष रमणिकलाल कोठाडिया, नाना जोशी, शामराजे कुंभार, धनंजय काकडे, आदी नेत्यांसह नीरा, निंबूत परिसरातील हजारो महिला आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. मूकमोर्चा पोलीस चौकीत आल्यानंतर संबंधित नेते मंडळींचे शिष्टमंडळाने बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, भोर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक अशोक भरते, पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्याकडे सर्व आरोपींच्या अटकेची मागणी केली. तेव्हा संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चव्हाण कुटुंबातील चौघांना अटक केलेली असून, उर्वरित फरारी आरोपींचा शोध सुरूअसल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. या प्रकरणातील आरोपी पृथ्वीराज चव्हाण, धर्मराज चव्हाण, अक्षय चव्हाण, विराज चव्हाण या चौघा आरोपींना पोलिसांनी मध्यरात्रीच अटक केल्याचे मोर्चातील जमावासमोर सांगून याप्रकरणी पोलिसांनी कडक कारवाई केलेली असून, उर्वरित फरारी आरोपी लवकरच अटक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी मोर्चातील जमावाला आश्वासन दिले. तत्पूर्वी सतीश काकडे, प्रमोद काकडे, रमणिकलाल कोठाडिया, नाना जोशी, सुजाता दगडे यांच्यासह काही महिलांनी भावना व्यक्त केल्या. दरम्यान, नीरेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. (वार्ताहर)चौघांना अटक ; सहा आरोपी फरार नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा शहरात ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाचा राग धरून पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य विराज काकडे, माजी सरपंच राजेश काकडे, विद्यमान उपसरपंच दीपक काकडे यांच्यासह आणखी तीन कार्यकर्त्यांना तलवार, लोखंडी गज, चॉपर, आदी हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पृथ्वीराज हनुमंत चव्हाण, धर्मराज दत्तात्रय चव्हाण, अक्षय विजय चव्हाण, विराज मदन चव्हाण (सर्व रा. नीरा शिवतक्रार, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत. यातील आणखी सहा आरोपी फरार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. जखमींवर उपचार सुरू आहेत.