पुणे: पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण भागात वाढत असलेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी तिन्ही युनिट कमांडरकडून सविस्तर आढावा घेतला. गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करून कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
पाषाण रोडवरील बिनतारी संदेश विभागाच्या (वायरलेस) मुख्यालयात शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सात वाजता ही आढावा बैठक पार पडली. दोन ते तीन तास चाललेल्या या बैठकीस पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांचा झपाट्याने होत असलेला विस्तार, औद्योगिक वसाहती आणि सीमाभागामुळे संघटित गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचे निदर्शनास आणण्यात आले. गेल्या काही वर्षांत टोळीसंघर्षातून झालेले खून, दहशत निर्माण करण्यासाठी होणारी वाहनतोडफोड, तसेच नव्याने उदयास येणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दाते यांनी दिले.
अंमली पदार्थविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात कारवाई आणि व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी संबंधित आयुक्त व पोलिस अधीक्षकांनी सराईत गुन्हेगारांवर करण्यात आलेली प्रतिबंधात्मक कारवाई, मोडीत काढलेल्या संघटित टोळ्या आणि पुढील कार्ययोजना यांचे सादरीकरण पोलिस महासंचालकांसमोर केले.
Web Summary : Maharashtra's police chief Sadanand Date reviewed Pune's rising crime, instructing commanders to eradicate it and strengthen law enforcement. He emphasized action against gangs, drug trafficking, and preventive measures against habitual offenders.
Web Summary : महाराष्ट्र के पुलिस महानिदेशक सदानंद दाते ने पुणे में बढ़ते अपराध की समीक्षा की और कमांडरों को इसे खत्म करने और कानून प्रवर्तन को मजबूत करने का निर्देश दिया। उन्होंने गिरोहों, नशीली दवाओं के कारोबार और आदतन अपराधियों के खिलाफ निवारक उपायों पर कार्रवाई पर जोर दिया।