शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्टॉल घोटाळा आता आयुक्तांच्या कोर्टात

By admin | Updated: September 27, 2016 04:18 IST

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने वाटलेल्या स्टॉलचा घोटाळा आता विभागीय आयुक्तांच्या कोर्टात दाखल होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी

पुणे : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने वाटलेल्या स्टॉलचा घोटाळा आता विभागीय आयुक्तांच्या कोर्टात दाखल होणार आहे. जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे यांनी आयुक्तांना पत्र दिले असून जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची दिशाभूल करून जादा दराने खरेदी केलेल्या स्टॉलच्या रकमा वसूल करा, अशी मागणी केली आहे.नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृहापुढे कोंडे यांनी हा स्टॉल घोटाळा मांडला होता. ३० हजारांचा स्टॉल ७३ हजारांना वाटल्याचा त्यांचा आरोप असून, त्यात सुमारे २ कोटींच्या आसपास पुरवठादाराला जादा पैसे दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. सन २०१५-१६च्या अर्थसंकल्पात मागासवर्गीय व अपंगांना व्यवसाय करण्यासाठी स्टॉलवाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. त्यानुसार निविदा काढून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने मागासवर्गीयांसाठी ३ कोटीच्या ४१० स्टॉल व अपंगांसाठी १ कोटी ५० हजारांचे २०५ असे ४ कोटी ५० हजारांचे ६१५ स्टॉल खरेदी केले. हे स्टालॅ स्टील फॅब नावाच्या ठेकेदाराकडून जिल्हा परिषदेने घेतले आहेत. यापूर्वी २५ ते २७ हजारांना घेतलेले स्टॉल यावर्षी ७३ हजारांना घेतल्याने त्यांनी अधिक माहिती घेतली असता, अनेक धक्कादायक प्रकार समोर आल्याचे निवेदनात म्हटले आहे. जि.प. ठराव क्र. ६५८ नुसार या आदेशाला मंजुरी दिली आहे. मात्र, या साहित्याच्या बाबातीत तांत्रिक व दराचे असे दोन्ही लिफापे सभेपूर्वीच उघडलेले असताना निविदा स्वीकृती झालेली नाही, असे सांगून सभागृहाची दिशाभूल करण्यात आली. मात्र, त्याच दिवशी ही निविदा उघडण्यात आली होती. निविदेतील अटी व शर्ती या ठराविक अपेक्षित पुरवठादारांनाच निविदा भरता याव्यात, यासाठी खरेदी समीतीने तयार केल्याचेही कोंडे यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)...अन्यथा मी उपोषण करेनकोंडे यांनी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. जादा दराने खरेदी केल्याने गोरगरिबांच्या वाट्याला येणारे स्टॉल त्यांना मिळाले नाहीत. साहेब, तुम्ही याची चौैकशी करून काय ते बाहेर काढले पाहिजे. नाही तर, मी जिल्हा परिषदेच्या गेटवर उपोषणास बसेन, असे कोंडे यांनी देसाई यांना सांगितले. यावर त्यांनी कोंडे यांना उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, असे अश्वासन दिले आहे.साहित्याचे दर सभेच्या दिवशीच सकाळी उघडले होते; परंतु अवास्तव दर सभेसमारे आल्यास विरोध होईल म्हणून जाणीवपूर्वक ही बाब सभागृहासमोर आणली नाही. सभागृहाची दिशाभूल करून ३० हजारांचे स्टॉल ७३ हजारांना घेतले.-कुलदीप कोंडे, जिल्हा परिषद सदस्य