रस्त्याच्या कडेला लघुशंका करायला थांबले; ४ जणांकडून पोलीस शिपायाला बेदम मारहाण, कात्रज - कोंढवा रस्त्यावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 13:54 IST2025-10-13T13:54:14+5:302025-10-13T13:54:54+5:30
रात्री आपली डय़ुटी संपल्यावर घरी दुचाकीने जात असताना कात्रज कोंढवा मुख्य रस्त्यावर कडेला अंधारात लघवीसाठी थांबले होते

रस्त्याच्या कडेला लघुशंका करायला थांबले; ४ जणांकडून पोलीस शिपायाला बेदम मारहाण, कात्रज - कोंढवा रस्त्यावरील घटना
पुणे: पुण्यातील कात्रजकोंढवा रस्त्यावर एका पोलीस शिपायाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रवीण रमेश डिंबळे (वय 33 वर्ष) असे त्यांचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलीस वाहतूक विभाग येथे ते कार्यरत आहेत
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण रमेश डिंबळे हे रविवारी रात्री आपली डय़ुटी संपल्यावर घरी दुचाकीने जात होते. कात्रजकोंढवा मुख्य रस्त्यावर कडेला अंधारात लघवीसाठी थांबले होते. त्यावेळी त्यांच्यावर लक्ष ठेवून असलेल्या एका चार चाकी वाहनातून एका व्यक्तिने व इतर चार जणांनी त्यांची गाडी थांबवली. तेथे लघवी करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली आहे. अंगावर वर्दी असताना पोलीस असल्याचे लक्षात येऊन देखील पोलीस प्रवीण डिंबळे यांना मारहाण करण्यात आली आहे. जखमी पोलीस प्रवीण डिंबळे हे ससून हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीस ठाण्यातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण व पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ भेट दिली.
पोलिसांवरील हल्ल्याचा कोंढवा - कात्रज या भागातील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था यांनी याबाबत नाराजी व्यक्त करून लवकरात लवकर याबाबत गृहमंत्री व पोलीस आयुक्त यांची भेट घेणार असल्याचे सांगितले जात आहे.