शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बुडीत बंधाऱ्याचा पथदर्शी प्रकल्प गाळात

By admin | Updated: April 19, 2017 04:14 IST

पाणी झपाट्याने कमी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील घोड नदीवर बांधण्यात आलेले बुडीत बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत

डिंभे : पाणी झपाट्याने कमी होत असल्याने धरण पाणलोट क्षेत्रातील घोड नदीवर बांधण्यात आलेले बुडीत बंधारे कोरडे ठणठणीत पडत आहेत. यामुळे एक वेगळेच वास्तव समोर आले आहे. या बंधाऱ्यात पाण्याऐवजी जास्त गाळच साचलेला दिसत आहे. अवघ्या काही वर्षांत ते गाळाने भरू लागल्याने महाराष्ट्रातील हा पहिलावहिलाच पायलट प्रकल्प गाळाच्या गर्तेत सापडला आहे. आदिवासी गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी काही वर्षांपूर्वी बुडीत बंधाऱ्यांची संकल्पना राबविण्यात आली. आहुपे खोऱ्यातील बोरघर, अडिवरे, कोकणेवाडी, फुलवडे येथे; तर पाटण खोऱ्यात पाटण, साकेरी, महाळुंगे व तळपेवाडी येथे सुमारे साडेअकरा कोटी रुपये खर्चून पाटबंधारे विभागाने आठ बुडीत बंधारे बांधले. यामुळे २० आदिवासी गावांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच काहीअंशी शेतीच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लावता येईल, हा यामागचा उद्देश होता. काही वर्षे या पाण्याचा या भागाला दिलासाही मिळाला.या बंधाऱ्यांची उंची साडेपाच मीटर, पाया अडीच ते तीन मीटर, लांबी ५० मीटरपासून १०० मीटरपर्यंत अपेक्षित होती. मात्र, डिंभे धरण पाणलोट क्षेत्र हे दुर्गम डोंगरी भागात येत असल्याने हे बंधारे बांधण्यासाठी लागणारी वाळू, सिमेंट, खडी व स्टील या वस्तूंच्या वहातुकीसाठी त्या वेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या. प्राप्त परिस्थितीत उपलब्ध झालेल्या साधनसामग्रीवर ठेकेदारांनी या बंधाऱ्यांची कामे उरकती घेतली. यामुळे बंधाऱ्यांचा पाया कच्चा राहिला, तर काही बंधाऱ्यांचे बांधकाम अर्धवट झाले. परिणामी, आज अनेक बंधारे धरणातील पाणी कमी होऊ लागताच कोरडे ठणठणीत पडूत आहेत. सध्या तर या बंधाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने त्यांची साठवण क्षमता कमी झाली आहे.पावसाच्या पाण्याबरोबर दर वर्षी या धरणात डोंगरउतारावरून मोठ्या प्रमाणात माती वाहून येते. ही माती या बुडीत बंधाऱ्यांत साठून राहते.