शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ११ मेपासून

By admin | Updated: May 9, 2017 03:43 IST

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने शतकोत्तर रौप्य वर्षानिमित्त हिंद केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्यावतीने शतकोत्तर रौप्य वर्षानिमित्त हिंद केसरी कुस्ती स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्यानंतर, राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन ११ ते १४ मे दरम्यान करण्यात येणार असून, या स्पर्धेत एकूण १० लाख २२ हजार रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोडसे म्हणाले की, महाराष्ट्र कबड्डी संघटनेच्या मान्यतेने आणि पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या सहकार्याने बाबूराव सणस मैदानावर स्पर्धा होईल. विजेत्या पुरुष व महिला विजेत्या संघाला अनुक्रमे १ लाख ५१ रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे. ट्रस्टचे सदस्य व नगरसेवक हेमंत रासणे म्हणाले की, या स्पर्धेसाठी सणस मैदानावर खास चार मातीची मैदाने तयार करण्यात आली आहेत. पुरुष आणि महिलांचे एकूण ३५ संघ सहभागी होणार आहेत. यात पुणे, कोल्हापूर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, ठाणे, सातारा येथील संघ सहभागी झाले आहेत. पारितोषिके : पुरुष व महिला : प्रथम क्रमांक : अंतिम विजयी संघास रु. १,५१,०००/- आणि चषक, द्वितीय क्रमांक : अंतिम उपविजयी संघास रु. १,२५,०००/- आणि चषक, तृतीय क्रमांक : उपांत्य उपविजयी संघास रु. १,००,०००/- आणि चषक.