महापालिकेवर भाजपची सत्ता असल्यानेच राज्य सरकारचा पुण्याबाबत दुजाभाव : भाजपचे जोरदार टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 07:09 PM2021-04-28T19:09:02+5:302021-04-28T19:16:27+5:30

शहरातील कोरोना परिस्थिती गंभीर असताना देखील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनसह कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा केला जात आहे.

State government's partiality with Pune due to power on corporation : BJP's aligation | महापालिकेवर भाजपची सत्ता असल्यानेच राज्य सरकारचा पुण्याबाबत दुजाभाव : भाजपचे जोरदार टीकास्त्र 

महापालिकेवर भाजपची सत्ता असल्यानेच राज्य सरकारचा पुण्याबाबत दुजाभाव : भाजपचे जोरदार टीकास्त्र 

Next

पुणे: पुण्यातील वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना रुग्णांना उपचार मिळण्यात येणारी अडचण यावरून पालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधीपक्षांमध्ये सातत्याने आरोप प्रत्यारोप होत असतात. एकमेकांवर टीकेची एकही संधी दोन्हीही बाजूने सोडली जात नाही. आता पुण्यातील ससून रूग्णालय सोडून अन्य कोणत्याही ठिकाणी राज्य सरकार काहीही काम करत नाही, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. तसेच शहरातील कोरोना परिस्थिती गंभीर असताना देखील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनसह कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा केला जात आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्यानेच महाविकास आघाडी सरकार पुणे शहराबाबत दुजाभाव करत आहे, असे टीकास्त्र पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे. 

भाजपच्या शिष्टमंडळाने पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची बुधवारी( दि. २८) कोरोनाची परिस्थितीबाबत भेट घेतली. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने,  शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गटनेते गणेश बिडकर, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

यावेळी खासदार बापट म्हणाले,‘ पुणे शहराच्या विविध भागांंमध्ये महापालिकेने १८४ लसीकरण केंद्र सुरू केली आहेत. परंतु, लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांना लस न घेताच जावे लागत आहे. त्यामुळे सर्वच लस केंद्रावर त्यांची गैरसोय होत असून मनस्ताप सहन करावा लागत आहे. १ मे पासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. त्यात लसीकरणासंदभात सूक्ष्म नियोजन करण्याची आवश्यकता आहे. ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. या नागरिकांना दुसरा डोस सहज उपलब्ध होण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. 

मुळीक म्हणाले, शहरात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण करण्यात सुरु होणार आहे. त्यासाठी मतदार केंद्रनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावेत. पुरेशा लसींचा साठा उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. नागरीकांमध्ये नोंदणी, जनजागृती आणि लसीकरण केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून भाजपचे कार्यकर्ते मदत करण्यास तयार आहेत.’
... 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे झोपी गेले आहेत. ते घरातून बाहेर पडत नाहीत. शहरात रूग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर उपलब्ध होत नाही. आरोग्याची स्थिती गंभीर आहे. आमच्यावर केवळ वायफळ टीका करण्यापेक्षा त्यांनी घराबाहेर पडून नागरिकांना मदत केेली पाहिजे. असे सडेतोड प्रत्युतर मुळीक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांना दिले.

Web Title: State government's partiality with Pune due to power on corporation : BJP's aligation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.