Kangana Ranaut Edcuation : निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या बॉलिवूडच्या 'क्वीन'चं शिक्षण ऐकून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 12:16 PM2024-05-17T12:16:08+5:302024-05-17T12:20:20+5:30

Kangana Ranaut Edcuation : बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत कंगनाला कोण ओळखत नाही, पण बॉलिवूडची क्वीन म्हणवल्या जाणाऱ्या कंगना राणौतचे शिक्षण किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत कंगनाला कोण ओळखत नाही, पण बॉलिवूडची क्वीन म्हणवल्या जाणाऱ्या कंगना राणौतचे शिक्षण किती आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत नेहमीच चर्चेत येत असली तरी, यावेळी ती लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत आहे.

हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून कंगना राणौत निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.

अशा परिस्थितीत कंगनाच्या शिक्षणाबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कंगना राणौतच्या शाळा आणि कॉलेजबद्दल.

रिपोर्ट्सनुसार, कंगना फक्त १० वी पास आहे, तिने १२वीची परीक्षा दिली होती पण ती त्यात नापास झाली होती.

कंगनाला वैद्यकीय क्षेत्रात जायचे होते पण १२वीत नापास झाल्यानंतर तिचे स्वप्न अपूर्ण राहिले.

कंगनाने वयाच्या १६ व्या वर्षी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर तिच्या मेहनतीच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.