शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीची पेरणीही यंदा कमीच

By admin | Updated: October 27, 2015 00:54 IST

खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे.

पुणे : खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे. यंदा जिल्ह्यात फक्त ८६ टक्के पाऊस झाला आहे. त्यातून जूनची सरासरी ओलांडून पावसाने दडी मारली. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. भातपिक वगळता सर्वच पिके वाया गेली; मात्र सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाले. या महिन्यात सरासरी १४६.०४ मिलिमीटर पाऊस पडतो. तो १८०.७७ मिलिमीटर म्हणजे टक्केवारीत तो १२३.७८ इतका झाला. यामुळे रब्बी हंगामाला काहीसा दिलासा मिळाला. रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ते ४ लाख ३१ हजार ८०० हेक्टरवर घेतले जाते. गेल्या वर्षी ३२ टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा आजपर्यंत १ लाख १२ हजार ४०० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून ती २६ टक्के इतकी आहे. यापुढे ज्वारीचे पेरणी होणे शक्य नाही. त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षाही यंदा कमीच क्षेत्रावर ज्वारी पेरणी झाली आहे. त्यात अजून परतीच्या एका पावसाची या पिकासाठी गरज आहे. तो झाला नाही तर हे पीकही हाताला लागणार नाही. बारामती, पुरंदर, आंबेगाव परिसरात चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)गव्हाच्या 0 टक्के पेरण्याजिल्ह्यात रब्बी हंगामात ६५ हजार ४00 हेक्टरवर गहू पीक घेतले जाते. मात्र अद्याप या पिकाच्या 0 टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. यापुढील काळातही शेतकरी पाणी नसल्याने पीक घेईल का नाही याची शाश्वती नाही.आॅक्टोबर संपला तरी जिल्ह्यात १८ टँकरने १२ गावे ७९ वाड्या-वस्त्यांवर ३८ हजार २१ लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात सर्वाधिक ८ टँकर इंदापूर तालुक्यात सुरू असून, त्यानंतर बारामतीत ५, पुरंदरला ४ व दौंड तालुक्यात १ टँकर सुरू आहे. गेल्या वर्षी या महिन्यात फक्त तीन टँकरने तोही बारामतीत पाणीपुरवठा सुरू होता.