शहरं
Join us  
Trending Stories
1
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
2
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
3
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
4
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
5
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
6
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
7
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
8
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
9
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
10
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
11
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
12
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
13
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
14
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
15
नालेसफाईच्या ठेक्यात १५ टक्के लाचेची मागणी; एपीएमसी उपसचिव अडकला एसीबीच्या जाळ्यात
16
महाविद्यालयात किती रिक्त जागा; आज कळणार , अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा २१ मेपासून 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण; याचिकेवर सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
18
‘डीसीजीए’ विमान इंधन स्वीचची  ‘बोईंग’मध्ये करणार चौकशी; पथक लवकरच अमेरिकेत जाऊन तपास करणार
19
भटके कुत्रे : सुप्रीम कोर्टाने आपली जबाबदारी झटकली; मनेका गांधींचा आरोप, पूर्वीचे आदेशच सांगितले
20
राखीव प्रवर्गांबाबतच्या ‘त्या’ निर्णयाला स्थगिती, मंत्रिमंडळाचा निर्णय : महाधिवक्त्यांचे मत घेणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी सोनल पाटील

By नम्रता फडणीस | Updated: June 7, 2023 14:25 IST

तत्कालीन सचिव मंगल कश्‍यप यांची बदली झाल्यानंतर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली...

पुणे : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिवपदी न्यायाधीश सोनल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तत्कालीन सचिव मंगल कश्‍यप यांची बदली झाल्यानंतर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. पाटील यांनी सोमवारी (दि. ५) पदभार स्वीकारला.

पाटील या २००९ साली दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ विभाग) म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यांनी  औरंगाबाद, कोल्हापूर, अहमदनगर जिल्ह्यात न्यायदानाचे काम केले. त्यानंतर त्या कोल्हापूर येथे सहायक धर्मादाय आयुक्त होत्या. विशेष म्हणजे पाटील यांनी आठ वर्ष प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून काम केले आहे. मे २०२१ पाटील या उच्च न्यायालयातील अपील विभागात उपनिबंधक म्हणून कार्यरत होत्या. पाटील यांनी एलएलबी आणि एलएलएमची पदवी मिळवली आहे. तसेच त्यांनी मानही हक्क आणि सामाजिक कायदे विषयांत डिप्लोमा केला आहे. सध्या त्या भारती विद्यापीठमधून सायबर कायदे विषयात पीएच.डी. करीत आहेत.

न्यायालयात प्रलंबित असलेल्या तसेच दाखलपुर्व दावे निकाली काढण्यासाठी लोकअदालत व प्राधिकरणाच्या इतर उपक्रमांच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जाणार आहेत. प्राधिकरणाच्यामार्फत कायदेशीर मदत तसेच मध्यस्थी या योजनांचा वापर करून मला गरजू आणि व्यक्तींच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवायचा आहे. शांततामय समाज निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतील. 
सोनल पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड