शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात साजरा होणार सामाजिक समता सप्ताह

By admin | Updated: April 5, 2015 00:44 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे.

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यात सामाजिक न्याय विभागामार्फत दि. ८ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ साजरा केला जाणार आहे. या कालावधीत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेद्वारे देशाला समता, स्वातंत्र्य व बंधूत्व या त्रिसूत्रीने समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याअनुषंगाने राज्यात अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर मागास वर्गातील घटकांसाठी विविध योजना राबविल्या जातात. वंचित, दुर्बल घटकांचा सर्वांगीण विकास करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत समता प्रस्थापित करण्याचा त्यामागे उद्देश आहे. त्यानिमित्त डॉ. आंबेडकर यांचे समतेचे मूल्य समाजात अधिक रुजावे, यासाठी सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन केले जाणार आहे. त्या माध्यमातून राज्यात सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या सप्ताहासाठी १ कोटी ८२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. समाजकल्याण आयुक्त रणजितसिंह देओल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सामाजिक चळवळीतील विचारवंतांचे समाजप्रबोधन व्याख्यान दि. १३ रोजी आयोजित केले जाणार आहे. पुण्यात सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत सप्ताहाची सांगता होईल. (प्रतिनिधी)समता सप्ताहाचे उद्घाटन ८ एप्रिलला सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी एकाच वेळी केले जाणार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेअंतर्गत कर्जाचे वाटप (दि. ९) लाभार्थ्यांना केले जाईल. दि. ११ रोजी रक्तदान शिबिर व दि. १२ तारखेला अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे नियोजन आहे.