शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘रेरा’ सजग ग्राहकांसाठी ढाल

By admin | Updated: May 9, 2017 03:47 IST

‘बांधकाम व्यावसायिकांवर नियंत्रण आणणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ (रेरा) हा कायदा ग्राहकांसाठी ढाल आहे. मात्र, या कायद्याचा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘बांधकाम व्यावसायिकांवर नियंत्रण आणणारा रिअल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ (रेरा) हा कायदा ग्राहकांसाठी ढाल आहे. मात्र, या कायद्याचा अभ्यास करूनच सजग ग्राहकांनी कोणताही व्यवहार करणे आवश्यक आहे. कायद्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे न झाल्यास त्याचा ग्राहकांना फारसा फायदा होणार नाही. ‘रेरा’साठी राज्य शासनाने केलेल्या नियमावलीत काही त्रुटी असल्याने त्याचा बांधकाम व्यावसायिकांनाच अधिक फायदा होवू शकतो’, असा सूर ‘रेरा’ कायद्यावर आयोजित चर्चासत्रात उमटला.सजग नागरिक मंचच्या वतीने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चेत सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार, सनदी लेखापाल बाबासाहेब माने, अ‍ॅड. हेमंत भोपटकर आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ चिंतामणी वैजापूरकर सहभागी झाले होते. यावेळी मंचचे विवेक वेलणकर व जुगल राठी उपस्थित होते. चर्चासत्रामध्ये वक्त्यांनी ‘रेरा’चे फायदे, अंमलबजावणीतील त्रुटी, ग्राहकांची भूमिका, बांधकाम व्यावसायिकांवर येणारी बंधने, अशा विविध मुद्द्यांवर मते मांडली. माने यांनी या कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच काही तरतुदी बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्याच्या असून त्याचा गैरवापर होऊ शकतो, अशी भीती माने यांनी व्यक्त केली.