शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरासह जिल्ह्यात गुरूवारी ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू : आत्तापर्यंत २४ जणांचा बळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 20:53 IST

शहरातील कोरोनाबाधितांची वाढ आटोक्यात ससूनसह शहरातील रूग्ण संख्या १७६

ठळक मुद्देपुणे शहरातील कोरोनाबाधितांची ही वाढ आटोक्यात आल्याचे आशादाची चित्र

पुणे : कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असतानाच, पुणे शहरातील कोरोनाबाधितांची ही वाढ आटोक्यात आल्याचे आशादाची चित्र पाहण्यास मिळाले. पुणे शहरात  ३ एप्रिलपासून दहा-वीस रूग्णांची नित्याने होणारी ही वाढ आज ७ वर आली आहे. मात्र मृत्यूचे सत्र अद्यापही थांबले नसून, आज नव्याने ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, मृत्यू पावलेले हे सहा रूग्ण अन्य आजारानेही ग्रस्त होते. पुणे शहरासह जिल्ह्यात आत्तापर्यंत ज्या २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बहुतांशी जणांचे वय हे ५५ च्या पुढील असून, ते अन्य आजारांनेही ग्रासलेले होते.  जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी सहा वाजेपर्यंत कोरोनाबाधितांची जिल्ह्यातील एकूण संख्या २१० झाली असून, यामध्ये पुणे शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १७६ इतकी आहे. यामध्ये नायडू हॉस्पिटलमधील १०५ रूग्णांसह शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील १३७ रूग्ण व ससून हॉस्पिटलधील ३९ रूग्णांचा समावेश आहे़. तर ग्रामीण भागातील १२ व पिंपरी-चिंचवडमधील २२ रूगणांचा यात समावेश आहे. आजपर्यंत कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या ही २४ असून, यामध्ये ससून हॉस्पिटलमधील १६ जणांचा, जिल्हा रूग्णालयातील एकाचा, खाजगी हॉस्पिटलमधील ६ जणांचा तर नायडू हॉस्पिटलमधील १ कोरोनाबाधित रूग्णाचा समावेश आहे. आज मृत्यू झालेल्यांमध्ये सहा रूग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातील असून, १ बारामतीमधील रहिवाशी आहे. यामध्ये सह्याद्री हॉस्पिटलमधील ४२ वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. सदर रूग्णास श्वसन संस्थेतील जंतूसंसर्ग, अल्कोहोलीक लिवर व मधूमेहाचा विकार होता. ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या व पुण्यातील रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय कोरोनाबाधीत महिला रूग्णाचा मृत्यू झाला़ सदर महिला निमोनिआ व किडनी विकाराने त्रस्त होती. तसेच ससून हॉस्पिटलमध्येच उपचार घेत असलेल्या बारामती येथील ६५ वर्षीय कोरोनाबाधिताचा पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला असून त्यासही निमोनिआ विकार होता. नोबल हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेल्या ६२ वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रूग्णालाही निमोनिआ, मधुमेह होता तसेच त्याचे बहु अवयव निकामी झाले होते. जहांगिर हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेल्या ६२ वर्षीय कोरोनाबाधित महिलेला मधूमेह व अल्सरचा त्रास होता़ तर ससूनमध्ये मृत्यू झालेल्या अन्य ५८ वर्षीय रूग्णास निमोनिआ व श्वसन विकार होता. सद्यस्थितीला सह्याद्री हॉस्पिटलमधील एका रूग्णाची प्रकृती गंभीर आहे़ दरम्यान नायडू हॉस्पिटल व खाजगी हॉस्पिटलमधून आजपर्यंत १८ जण उपचाराअंती पूर्ण बरे होऊन घरीही गेले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर