Pune: मेहुणी चहा करायला आत गेली अन् डाव साधला; अत्याचार करणाऱ्या चुलत दिराला १० वर्षे जेलची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 18:02 IST2026-03-05T18:01:34+5:302026-03-05T18:02:15+5:30

आरोपीच्या परिचयाचे लोक साक्ष फिरविण्यासाठी दबाव टाकत असल्याचे महिलेच्या पतीने न्यायालयात सांगितले

Sister-in-law went inside to make tea and hatched a plan; The cousin who tortured her should be jailed for 10 years | Pune: मेहुणी चहा करायला आत गेली अन् डाव साधला; अत्याचार करणाऱ्या चुलत दिराला १० वर्षे जेलची हवा

Pune: मेहुणी चहा करायला आत गेली अन् डाव साधला; अत्याचार करणाऱ्या चुलत दिराला १० वर्षे जेलची हवा

पुणे : मेहुणी चहा करायला आत गेली आणि चुलत दीराने डाव साधला. तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४३ वर्षाच्या चुलत दीराला दहा वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा बारामती अतिरिक्त सत्र न्यायालयाने ठोठावली. केवळ पीडितेच्या विश्वासार्ह साक्षीच्या आधारेही आरोपीला दोषी ठरविता येऊ शकते, या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा दाखला देत अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी हा निकाल दिला. आरोपीविरोधात पीडितेने नोंदविलेली साक्ष विश्वासार्ह व ठोस असून, तिला पती आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष व न्यायवैद्यक तपासणी अहवाल दुजोरा देणारा ठरला.

गुन्ह्याचे स्वरूप व गांभीर्य आणि आरोपीने एका असहाय महिलेविरुद्ध गुन्हा केला आहे ही बाब लक्षात घेत त्याला शिक्षा देणे न्याय ठरेल, असे नमूद करत न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली; तसेच पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला भरपाई देण्याचे आदेशही दिले. या प्रकरणी पीडितेने बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेनुसार बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. नात्याला काळिमा फासणारी ही घटना १४ जून २०२४ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बारामती येथील प्रगती नगर परिसरात पीडितेच्या घरात घडली. पीडितेचे पती सुरक्षारक्षक आहेत; तर आरोपी कामगार आहे. घटनेच्या दिवशी दुपारी दीड वाजता आरोपी पीडितेच्या घरी आला. त्या वेळी पीडितेचे पती कामावर गेले होते. पीडितेने आरोपीला चहा दिला. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास पीडिता पुन्हा चहा करण्यासाठी गॅसजवळ गेली असता, आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही पीडितेला दिली. त्यामुळे घाबरलेल्या पीडितेने पतीच्या कामाच्या ठिकाणी धाव घेतली. पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगितल्यानंतर बारामती शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील के. एस. नवले यांनी काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासले. त्यामध्ये पीडितेची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचा बचाव केला. मात्र, आरोपीच्या परिचयाचे लोक पीडितेला साक्ष फिरविण्यासाठी दबाव टाकत असल्याचे पीडितेच्या पतीने न्यायालयात सांगितले.

Web Title : पुणे: चाची चाय बनाने गई, चचेरे भाई को 10 साल की जेल।

Web Summary : पुणे में, एक व्यक्ति को अपनी चचेरी बहन की पत्नी पर यौन हमला करने के लिए 10 साल की सजा मिली। बारामती अदालत ने उसे उसके विश्वसनीय गवाही और सहायक सबूतों के आधार पर दोषी ठहराया। घटना बारामती में पीड़िता के घर पर हुई।

Web Title : Pune: Aunt went to make tea, cousin gets 10 years jail.

Web Summary : In Pune, a man received a 10-year sentence for sexually assaulting his cousin's wife. The Baramati court convicted him based on her reliable testimony and supporting evidence. The incident occurred at the victim's home in Baramati.