Sidhu Moosewala : सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणातील आरोपीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 04:28 PM2022-06-08T16:28:30+5:302022-06-08T16:56:40+5:30

पुणे ग्रामीण पोलिसांच्य स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई...

Sidhu Musewala murder case Accused Siddhesh Kamble arrested by pune police | Sidhu Moosewala : सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणातील आरोपीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Sidhu Moosewala : सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणातील आरोपीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

googlenewsNext

पुणे : सिद्धू मूसेवाला खून प्रकरणाबद्दल पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येतेय. मूसेवाला हत्याकांडामध्ये सामील असणाऱ्या आरोपीला पुणे जिल्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी सिद्धेश कांबळे उर्फ महाकाळ यास पुणे ग्रामीण पोलिसांच्य स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीला 20 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ओंकार बानखेले खून प्रकरणात आरोपी असलेला संतोष जाधव याला लपण्यास कांबळेने मदत केली होती. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर मोक्का लावला आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धु मुसेवाला हत्या प्रकरणात पुणे कनेक्शन निष्पन्न झाले होते. मुसेवाला हत्या प्रकरणातील १० शॉर्प शुटरपैकी दोघे जण पुणे जिल्ह्यातील होते. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी सिद्धेश कांबळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचा राहणार असून मंचरची त्याची सासुरवाडी आहे. जाधव हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले यांच्या खून प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून तो फरार आहे. 

Web Title: Sidhu Musewala murder case Accused Siddhesh Kamble arrested by pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.