शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
4
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
5
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
6
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
7
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
8
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
9
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
10
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
11
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
12
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
13
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
14
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
15
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
16
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
17
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
18
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
19
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
20
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमंत महापालिका भंगार विक्रीतही ‘श्रीमंत’

By admin | Updated: July 3, 2015 23:54 IST

एकेक करून अनेक चीजवस्तू निकालात काढून त्यांच्या विक्रीतून भांडार विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षात थोडेथोडके नव्हे, तर मागील २ कोटी ५१ लाख ८१ हजार

अंकुश जगताप , पिंपरीपिंपरी : एकेक करून अनेक चीजवस्तू निकालात काढून त्यांच्या विक्रीतून भांडार विभागाला २०१३-१४ या आर्थिक वर्षात थोडेथोडके नव्हे, तर मागील २ कोटी ५१ लाख ८१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे आधीच श्रीमंत असणारी पिंपरी-चिंचवड महापालिका भंगार विक्रीतूनही मालामाल झाल्याचे बोलले जात आहे. शहरामध्ये विविध प्रभागांच्या अखत्यारीत असणाऱ्या भागामध्ये वेळोवेळी जुने साहित्य, यंत्रसामग्री बदलून त्या जागी नूतनीकरण केले जात आहे. त्यामध्ये जुने पथदिवे बदलण्याच्या कामाचा धडाका सर्वत्र राबविला जात आहे. त्यासाठी केवळ पथदिवेच नाही, तर आधीचे संपूर्ण खांबच बदलले जात आहेत. शहरभरात मागील २ वर्षांत बहुतांश प्रभागांमधील पथदिव्यांचे खांब बदलले आहेत. असे खांब आणि विद्युत बल्ब, इलेक्ट्रॉनिक साहित्य यांचे ढीग पालिकेच्या भांडार विभागात जमा झाले. मागील काही वर्षांमध्ये शहरात अतिक्रमण विभागाकडून विविध ठिकाणी जोरदार कारवाई करण्यात आली आहे. शहरभरात जाहिरातफलकांचा सुळसुळाट वाढला आहे. अशा फलकांवर सध्या शहरभर कारवाईचा धडाका सुरू आहे. त्यात जाहिरातफलकांच्या लोखंडी चौकटी काढून त्या जप्त केल्या जात आहेत. विविध प्रभागांच्या आवारात अशा भंगारात काढलेल्या चौकटींचे ढीग पडत आहेत. दुसरीकडे शहरभरातील टपरी-पथारीवाल्यांवरही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाणीपुरवठा विभागातर्फे मागील काही वर्षांमध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रावेतच्या जलउपसा केंद्रापासून ते निगडीपर्यंतची मुख्य जलवाहिनी बदलली आहे. यासह अनेक प्रभागांमधील लहान-मोठ्या जलवाहिन्यांची दुरुस्ती अथवा नूतनीकरण करण्यात आल्याने जुन्या जलवाहिन्या भंगारात निघाल्या आहेत. याचबरोबर पंपसेट, पाणीवितरणाचे व्हॉल्व्ह यासह विविध विभागांमधील फर्निचर, शाळांमधील बाकडे, कार्यालयीन वस्तू व उपकरणांचाही त्यामध्ये समावेश आहे. कालबाह्य झालेल्या वाहनांचे टायर, ट्यूब, गिअर बॉक्स व भंगारात निघालेल्या विविध साहित्याचीही त्यामध्ये भर पडली आहे. मागील २ वर्षांमध्ये साठलेल्या अशा साहित्याचा लिलाव केला.चालू आर्थिक वर्षातील प्रलंबित लिलावाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या वर्षी अतिक्रमण विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई करून साहित्य जप्त केले आहे. इतर विभागांकडूनही साहित्य जमा झाले आहे. त्याची लिलाव प्रक्रिया पूर्ण होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिका सभेपुढे हा विषय मान्यतेसाठी आहे. दोन महिन्यांत हा लिलावही पूर्ण होईल. त्यातून महापालिकेला कोट्यवधींचे उत्पन्न मिळणार आहे. - दिलीप गावडे (भांडार व्यवस्थापक, पिंपरी-चिंचवड महापालिका)