Rohit Shetty: मुंबईत रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार; पुण्यातून ५ जणांना वारजे पोलिसांनी केले जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 11:44 IST2026-02-02T11:43:22+5:302026-02-02T11:44:04+5:30

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याचा तपास हाती घेतल्यावर संशयितांचे लोकेशन पुणे शहरातील वारजे परिसरात असल्याचे दिसून आले.

Shooting at Rohit Shetty's house in Mumbai; Warje police arrest 5 people from Pune | Rohit Shetty: मुंबईत रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार; पुण्यातून ५ जणांना वारजे पोलिसांनी केले जेरबंद

Rohit Shetty: मुंबईत रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार; पुण्यातून ५ जणांना वारजे पोलिसांनी केले जेरबंद

पुणे : प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार करणाऱ्या पाच जणांना वारजे पोलिसांनी पहाटे जेरबंद केले आहे. अमन आनंद मराठे (वय २७), आदित्य ज्ञानेश्वर गायके (१९), सिद्धार्थ दीपक येनपुरे (२०), समर्थ शिवशंकर पोमाजी (१८) आणि स्वप्निल बंडू सकट (२३) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

मुंबईतील जुहू परिसरातील रोहित शेट्टी यांच्या इमारतीबाहेर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याचा प्रकार शनिवारी रात्री घडला होता. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर इमारतीबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुंबईपोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी १२ जणांचे पथक स्थापन केले होते. या पथकाने घटनास्थळापासून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले. त्यात एकजण बाजूला मोटारसायकल लावून इमारतीसमोर चालत येतो, इमारतीवर पाच गोळ्या झाडतो आणि चालत परत मोटारसायकलपर्यंत येऊन त्यावरून निघून जातो, असे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने याचा तपास हाती घेतला. संशयितांचे लोकेशन पुणे शहरातील वारजे परिसरात असल्याचे दिसून आले. मुंबई गुन्हे शाखेने वारजे पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. वारजे पोलिसांनी कर्वेनगरमधून ५ जणांना ताब्यात घेतले. त्यांना मुंबई गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

Web Title : रोहित शेट्टी के मुंबई स्थित घर पर गोलीबारी; पुणे में पांच गिरफ्तार

Web Summary : रोहित शेट्टी के मुंबई स्थित घर पर गोलीबारी करने के आरोप में पुणे में पांच लोगों को गिरफ्तार किया गया है। जुहू में हुई इस घटना में कोई घायल नहीं हुआ। सीसीटीवी फुटेज की मदद से मुंबई पुलिस ने आरोपियों को पुणे में पकड़ा, जहां वारजे पुलिस ने उन्हें गिरफ्तार कर मुंबई पुलिस को सौंप दिया।

Web Title : Firing at Rohit Shetty's Mumbai Home; Five Arrested in Pune

Web Summary : Five individuals have been arrested in Pune for firing shots at Rohit Shetty's Mumbai residence. The incident occurred in Juhu; fortunately, no one was injured. Mumbai police, aided by CCTV footage, tracked the suspects to Pune, where Warje police apprehended them and handed them over to Mumbai authorities.