शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

धक्कादायक..! अजूनही शाबूत आहे परदेशातील बँकांमध्येच भारतीयांचा ' काळा पैसा '

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 11:46 AM

गेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी तेव्हा विरोधात असलेले रामदेव बाबा यांनी परदेशात भारतीयांनी लाखो कोटी रुपयांचा बेनामी पैसा ठेवला असल्याचे आरोप केले होते. हा

ठळक मुद्देमाहिती अधिकारात उघड : खात्यांची तपासणी देखील पाच वर्षांत पूर्ण नाही 

 पुणे : परदेशतील काही भारतीयांच्या बेनामी संपत्तीवरुन गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रान उठविणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सत्ता आल्यानंतर मात्र,  संशयित बेनामी संपत्ती गोळा करणाऱ्या खात्यांचा साधा तपासही पूर्ण करता आलेला नाही. संशयित ६२८ खात्यांपैकी साडेआठ हजार कोटी रुपये असलेल्या ४१७ प्रकरणांचा तपास गेल्या पाच वर्षांत झाला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सकडे त्याबाबतची माहिती मागितली होती. फ्रान्स सरकारने २०१२ साली स्विस बँकेत खाते असलेल्या ६२८ भारतीयांची जी यादी सरकारकडे दिली होती, त्याचाच उल्लेख करण्यात आला आहे. या खात्यातील ४१७ केसेसची तपासणी झाली असून, त्यातून ८ हजार ४६५ कोटी रुपयांचे काळे धन शोधले असल्याचे सांगण्यात आले. या शिवाय इंटरनॅशनल कन्सोरशियम ऑफ इनव्हेस्टीगेटीव्ह जर्नालिस्ट्स (आयसीआयजे) या संस्थेने सातशे भारतीयांची परदेशातील जी माहिती समोर आणली, त्यानुसार भारतीयांचे परदेशी बँकांमधील खात्यात ११ हजार १० कोटी रुपये असल्याचे म्हटले आहे. भारतात आणि भारताबाहेर नक्की किती बेनामी संपत्ती आहे, याचा निश्चित आकडा नसल्याचे उत्तर डायरेक्ट टॅक्सेसने दिले आहे. याबाबत बोलताना वेलणकर म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणूकीपुर्वी तेव्हा विरोधात असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते आणि रामदेव बाबा यांनी परदेशात भारतीयांनी लाखो कोटी रुपयांचा बेनामी पैसा ठेवला असल्याचे आरोप केले होते. हा पैसा भारतात आल्यास विकासकामांना गती मिळेल, तसेच कराचे ओझे देखील कमी होईल, असा दावा त्यांच्याकडून करण्यात येत होता. मात्र, सत्तेत आल्यानंतर त्यादृष्टीने काहीच झाले नाही. उलट पुर्वीच्या सरकारच्या काळात फ्रान्स सरकारने दिलेल्या यादी नुसार खात्यांचा तपासही पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यातील रक्कमेचा आकडा देखील अत्यंत कमी असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय तपासणी पूर्ण झालेल्या दोषी खातेदारांची नावे देखील अजून, जाहीर केलेली नाहीत.  

टॅग्स :Puneपुणेblack moneyब्लॅक मनीBJPभाजपाVivek Velankarविवेक वेलणकरGovernmentसरकार