शहरं
Join us  
Trending Stories
1
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
2
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
3
महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले
4
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
5
ना पोलीस आले, ना जागेवर तपास झाला; महत्त्वाचे पुरावेही गायब! ट्विशा शर्मा मृत्यूप्रकरणात उभे राहिले ३ मोठे प्रश्न
6
हृदयद्रावक! कारच्या मागच्या सीटवर झोपलेल्या नातीला आजोबा विसरले; गुदमरून चिमुकलीचा मृत्यू
7
Petrol Diesel Price Hike: हळूहळू खिशावर वाढणार 'भार', पेट्रोल-डिझेल दर वाढवण्यासाठी २०२२ चा फॉर्म्युला?
8
Vastu Tips: बेडरूममध्ये नकारात्मकता जाणवतेय? 'हे' तीन वास्तू उपाय मिळवून देतील मन:शांती 
9
Twisha Sharma : 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR
10
मंदिरांमधील सोन्यावर सरकारचा डोळा? सोशल मीडियावरील दाव्यामुळे खळबळ; सरकारने दिले स्पष्टीकरण
11
"मी AC मध्ये बसून तमाशा बघू शकत नाही...!" बंगालमधील 'नमाज बॅन'वर काय म्हणाले मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी
12
Numerology: तुमचा मोबाईल नंबर तुमच्यासाठी लकी आहे की अनलकी? मूलांकानुसार 'या' चुका टाळा
13
गाडीला अचानक हादरा देणारे Rumble Strips कशासाठी असतात, तुम्हाला माहितीये का?
14
हुंड्यामुळे ३३ वर्षीय अभिनेत्रीची आत्महत्या, प्रेग्नंट असतानाच संपवलं जीवन; अभिनेत्याला बसला धक्का, म्हणाला-"तिचं लग्न झालंय हेच..."
15
IPL Playoff Scenario: आरसीबी, एसआरएच, गुजरात प्लेऑफमध्ये; आता एका जागेसाठी ५ संघांमध्ये 'डू ऑर डाय'ची लढत!
16
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
17
अधिक मास २०२६: दहा पट अधिक पुण्य मिळवून देणारा पुरुषोत्तम मास; सुख-समृद्धीसाठी 'या' उपासना करा!
18
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
19
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
20
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
Daily Top 2Weekly Top 5

Shiv Jayanti 2026: भव्य प्रवेशद्वारे, रोषणाई आणि सांस्कृतिक जल्लोषाने शिवजन्मभूमी सजली; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मसोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 10:33 IST

Shiv jayanti 2026 छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून ढोल ताशांचा गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच सर्वांच्या वतीने शिवरायांना शासकीय मानवंदना देण्यात आली.

जुन्नर: राज्यभरातून शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींचा ओघ वाढत असताना शिवजन्मभूमी जुन्नर शहर दिमाखात सजले आहे. आमदार शरद सोनवणे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेली भव्य प्रवेशद्वारे, आकर्षक रोषणाई आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

बसस्थानकासमोर उभारण्यात आलेले ‘तुळजाभवानी’ त्रिमितीय प्रवेशद्वार तसेच जुन्नर-आपटाळे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जुन्नर परिसरातील शिवकालीन शौर्य मावळा प्रवेशद्वार सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. स्मारकाजवळून किल्ले शिवनेरी कडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवचरित्रावर आधारित प्रसंगांची मांडणी व तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या एलईडी प्रतिमा पर्यटकांना आकर्षित करत आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शिवजयंती कार्यक्रमाला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी शिवजन्मसोहळा साजरा करण्यात आला. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून ढोल ताशांचा गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच सर्वांच्या वतीने शिवरायांना शासकीय मानवंदना देण्यात आली.   

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून बसस्थानक चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, भगवे ध्वज आणि महाराजांच्या प्रतिमांनी परिसर भारावून गेला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारापासून शिवनेरी पायथ्यापर्यंत संपूर्ण मार्ग सजवण्यात आला आहे.

सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांचा जल्लोष

शंकरराव बुट्टे-पाटील विद्यालयाच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी प्रशस्त व्यासपीठ व बैठक व्यवस्था उभारण्यात आली आहे. बचत गटांच्या उत्पादनांसाठी तसेच खाद्यपदार्थांच्या दालनांनी मैदान गजबजले आहे. याच ठिकाणी कबड्डी व कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रावसाहेब बुट्टे-पाटील बैलगाडा घाटावर दोन दिवसांच्या बैलगाडा शर्यतीत सुमारे ३६० बैलगाड्यांचा सहभाग नोंदवला गेला आहे. पुणे जिल्हा परिषद व जुन्नर पंचायत समिती यांच्यावतीने वक्तृत्व, बुद्धिबळ, पोवाडे गायन, निबंध, गडचढण व चित्रकला स्पर्धा सुरू आहेत. जुन्नर वनविभागाने शिवनेरी परिसरात स्वच्छता मोहीम राबवली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ‘शिवकुंज’ स्मारकातील देखभाल अंतिम टप्प्यात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.

सुरक्षा, सुविधा आणि एलईडी स्क्रीनची व्यवस्था

शिवजयंती सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. पोलिस यंत्रणेने सौरऊर्जेवर चालणारे फिरते सूचनाफलक उभारले असून, दुचाकीवरील पेट्रोलिंग पथके तैनात केली आहेत. आरोग्य विभागाने मार्गावर आरोग्य पथके सज्ज ठेवली आहेत, तर जिल्हा परिषदेच्यावतीने स्वच्छतागृहे व विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीवरील मुख्य शासकीय सोहळ्यासाठी प्रवेशिका आवश्यक असून, मर्यादित कालावधीसाठीच प्रवेश देण्यात येणार आहे. शिवभक्तांना सोहळा पाहता यावा, यासाठी शिवाई मंदिर, पायथ्याशी दत्त मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shivjayanti 2026: Junnar Celebrates with Grandeur, Cultural Programs, and Official Ceremony

Web Summary : Junnar magnificently celebrates Shivjayanti with grand entrances, lighting, and cultural events. The Shivjanm ceremony was held with Chief Minister and Deputy Chief Minister present. Various cultural programs, sports competitions, and facilities are available for devotees.
टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजJunnarजुन्नरFortगडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेSunetra Pawarसुनेत्रा पवार