शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

शिरूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरूरमध्ये अमोल कोल्हेंना आघाडी, आढळराव नेमक्या किती मतांनी पिछाडीवर..  जाणून घ्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 11:17 AM

Shirur Lok Sabha Election 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करून ते चौकार मारणार का याबाबतच सगळीकडे उत्सुकता आहे.

शिरूरः शिवसेनेचे खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आतापर्यंत तीनदा विजय मिळवत शिरूरला हॅट्रिक साधली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना पराभूत करून ते चौकार मारणार का याबाबतच सगळीकडे उत्सुकता आहे. आढळराव पाटील यांनी सलग 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा जोर लावला आहे. स्थानिक उमेदवारांना संधी देऊनही यश न मिळाल्याने राष्ट्रवादीने यंदा शिवसेनेतून आयात केलेले अभिनेते अमोल कोल्हे यांना संधी दिली आहे. कोल्हे यांनाही तरुण आणि महिला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, इथे अटीतटीची लढत बघायला मिळाली होती.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, शिरूरमध्ये १५ व्या फेरीनंतर १९९२० मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना .१,९१, ६७१मतं मिळाली असून शिवाजीराव आढळराव यांच्या पारड्यात १, ७१, ७५१ मतं पडली आहेत.

2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची लढत करून एकत्रित ताकद लावूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी सलग विजय मिळवित हॅटट्रिक साधली होती.  आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम यांच्यावर तब्बल ३ लाख 1 हजार 453 मतांनी विजय मिळविला होता. आढळराव यांना 6, 42, 828 तर देवदत्त निकम यांना 3, 41, 375 मते मिळाली होती. शिवसेनेतून ऐन वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाऊन लढणारे अशोक खांडेभराड यांना केवळ 36, 431 मते तर आम आदमी पक्षाचे सोपानराव निकम यांना 16, 653 मते मिळाली होती.  11 हजार 971 मतदारांनी नकाराधिकार (नोटा) वापरला होता.

टॅग्स :Shirurशिरुरshirur-pcशिरूरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळराव