पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले

By नितीश गोवंडे | Updated: June 6, 2025 14:02 IST2025-06-06T14:01:42+5:302025-06-06T14:02:16+5:30

दुसऱ्याकडे लग्नाचा आग्रह केला असता त्याने नकार दिला, तसेच पतीने तिला आदल्या दिवशी फोन करुन धमकावले होते, नैराश्यातून तिने आत्महत्या केली

She came to her mother because she did not get along with her husband she got involved with someone else, he refused and the married woman ended her life. | पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले

पतीशी पटत नसल्याने आईकडे आली; दुसऱ्याशी संबंध जुळले, त्याने नकार दिला अन् विवाहितेने जीवन संपवले

पुणे: पतीशी पटत नसल्याने माहेरी येऊन राहिलेल्या विवाहितेशी लग्न करण्यास नकार दिल्याने व धमकावल्याने एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिपाली जाधव (२९, रा. आण्णाभाऊ साठे वसाहत, सिंहगड रोड) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचा भाऊ अभिजित सुधाकर भोसले (२३, रा. शाहुनगर, श्रीपुर, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी तुषार दादा कांबळे (रा. बावडा, ता. इंदापूर) आणि प्रवीण रामचंद्र चोपडे (रा. आकुर्डी खंडोबा माळ मंदिरासमोर) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आण्णाभाऊ साठे वसाहतीत २६ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता घडला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपाली जाधव ही फिर्यादी यांची बहीण आहे. दीपाली जाधव हिचा विवाह झाला होता. पतीशी पटत नसल्याने ती गेल्या ६-७ महिन्यांपासून आईकडे आण्णाभाऊ साठे वसाहतीत राहत होती. या दरम्यान तिचे तुषार कांबळे याच्याशी संबंध जुळले. तिने तुषार कांबळे याच्याकडे लग्नाचा आग्रह केला. त्याला त्याने नकार दिला. तसेच प्रवीण चोपडे याने तिला आदल्या दिवशी फोन करुन धमकावले होते. त्यामुळे नैराश्येतून दीपाली जाधव हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नामदे करत आहेत.

Web Title: She came to her mother because she did not get along with her husband she got involved with someone else, he refused and the married woman ended her life.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.