शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: January 21, 2015 23:12 IST

बनरफाटा-जुन्नर मार्गावरील खड्डे, मुख्य चौक व बनकरफाटा परिसरात खड्ड्यामध्ये साचणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मढ : बनरफाटा-जुन्नर मार्गावरील खड्डे, मुख्य चौक व बनकरफाटा परिसरात खड्ड्यामध्ये साचणाऱ्या सांडपाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी व मातीमुळे चिखलाने घसरगुंडी झाल्यामुळे दुचाकीस्वारांच्या अपघातातही वाढ झाली आहे.बनकरफाटा-जुन्नर मार्गावरील सर्व खड्डे बुजवणे व सांडपाण्याचे व्यवस्थापन व्हावे, म्हणून आमदारांकडून सूचना करण्यात आल्यावर संबंधित विभागाच्या दोन अधिकाऱ्यांनी बनकर फाटा येथे येऊन पाहणी केल्यावर त्वरित कारवाई होईल, असे वाटले होते. परंतु, बोलाची कढी व बोलाचाच भात या म्हणीप्रमाणे सर्व येऊन गेले. परंतु, प्रश्न मार्गी लागला नाही.दोन ते तीन दिवसांपूर्वी बनकर फाटा-जुन्नर मार्गावरील बनकर फाटा चौकातील जवळच जेथे संबंधित खात्याकडून खड्डे भरण्यासाठी माती टाकण्यात आली होती. तेथे पाणी व मातीच्या चिखलामुळे घसरगुंडी झाली व त्यातून घसरून पडलेले दुचाकीस्वार महादू चिमाजी बनकर यांचा पाय मोडला असून आहे. त्यानंतरही या मार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नरचे विभागीय अभियंते एन. जी. वैष्णव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याने संपर्क होऊ शकला नाही.(वार्ताहर)