शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमपीएमएल’च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:15 IST

पुणे : ‘पीएमपीएमएल’च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय ‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ ...

पुणे : ‘पीएमपीएमएल’च्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय ‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तर, या बैठकीत पुणेकरांच्या सेवेत २९ डिसेंबर २०२१ पर्यंत नव्याने ५०० बसेस आणण्याबाबतही निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले़

पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, पुणे महापालिका स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपीएमएल संचालक शंकर पवार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पीएमपीएमएल संचालक राजेंद्र जगताप, तसेच पीएमपीएमएल संचालक मंडळाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

वेतन आयोगाच्या निर्णयामुळे ‘पीएमपीएमएल’ ९ हजार ४९८ कामगारांना फायदा होणार आहे. यासाठी ३२५ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध करून देण्याबाबतही या वेळी मान्यता दिली़ या तरतुदीकरिता पुणे महापालिका ६० टक्के म्हणजेच १९५ कोटी रुपये तर, पिंपरी-चिंचवड महापालिका ४० टक्के म्हणजे १३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. हा सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सन २०१७-१८ पासून लागू होणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले़

‘पीएमपीएमएल’ ताफ्यात केंद्र सरकारच्या फेर-२ योजनेअंतर्गत १२ मीटरच्या १५० ई-बसेस भाडेतत्त्वावर घेणार आहेत. याकरिता ६३.९५ रुपये प्रति/किमी दर देणार आहे़ यामधील ७५ बसेस २५ सप्टेंबर २०२१ पर्यंत, तर उरलेल्या ७५ बसेस २९ डिसेंबर २०२१ पर्यंत रस्त्यावर उतरतील. केंद्र सरकार एका बसला ५५ लाखांचे अनुदान या फेर योजनेंतर्गत देणार असून, त्याचे एकूण ८२ कोटी रुपये बसेससाठी मिळणार आहेत, त्यातील १६.५ कोटी रुपये जमा झाल्याचे मोहोळ यांनी सांगितले़ तर ३५० इलेक्ट्रिकल बसेस भाडेतत्त्वावरती ६७.४० रुपये प्रति/किमी दराने रस्त्यावरती येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातील २८ मे २०२१ पर्यंत ७५ बसेस, २७ जून २०२१ पर्यंत ७५ बसेस, २७ जुलै २०२१ पर्यंत १०० बसेस आणि २६ ऑगस्ट २०२१ पर्यंत राहिलेल्या १०० बसेस रस्त्यावर येणार असल्याचेही ते म्हणाले़