शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

सिरमचा ‘कोव्होव्हॅक्स’ लस जूनपर्यंत बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST

पुणे : नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकी कंपनी आणि सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेल्या लसीची परिणामकारकता प्रभावी असल्याचे सिद्ध ...

पुणे : नोव्हाव्हॅक्स ही अमेरिकी कंपनी आणि सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया यांनी विकसित केलेल्या लसीची परिणामकारकता प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आता भारतात या लसीच्या चाचण्या सुरू करण्यासंदर्भात आम्ही अर्ज केला आहे, अशी माहिती ‘सीरम’चे सीईओ अदर पुनावाला यांनी शनिवारी (दि. ३०) ट्विट करून दिली. जून २०२१ पर्यंत ‘कोव्होव्हॅक्स’च्या प्रत्यक्ष वापराला सुरुवात होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नोव्हाव्हॅक्स या अमेरिकी कंपनीच्या कोरोना प्रतिबंधक लसीबाबतचे संशोधन व उत्पादन करण्याबाबत त्या कंपनीने ‘सिरम’शी ऑगस्ट २०२० मध्ये करार केला आहे. नोव्हाव्हॅक्स कंपनीच्या लसीचे भारतात उत्पादन करण्याचा विशेष हक्क या कराराद्वारे ‘सिरम’ला मिळाले आहेत. उच्च मध्यम किंवा उच्च उत्पन्न असलेले देश वगळता अन्य देशांसाठी कोरोना साथीच्या काळात ‘सिरम’ला नोव्हाव्हॅक्स लसीचे उत्पादन करण्याचा हक्क या कराराद्वारे मिळाला. सर्व परवानग्या मिळून चाचण्या सुरळीत पार पडल्यास कोव्होव्हॅक्स ही भारतात आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळणारी तिसरी लस असेल. याआधी अँस्ट्रेझेनिका या कंपनीची कोव्हीशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅकसिनला परवानगी मिळाली आहे.

ब्रिटनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या मानवी चाचण्यांमध्ये कोव्होव्हॅक्स लसींची परिणामकारकता ८९.३ टक्के इतकी असल्याचे सिद्ध झाले आहे. यामध्ये १८ ते ८४ या वयोगटातील १५ हजार स्वयंसेवकांवर लसीची चाचणी घेण्यात आली आणि त्याचे निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आले. कोरोनाच्या नवीन स्ट्रेनवरही ही लस प्रभावी असल्याचे विविध संशोधनातून सिद्ध झाले आहे.