पुण्यात भरधाव ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; मद्यधुंद चालकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:27 IST2026-01-29T17:24:56+5:302026-01-29T17:27:57+5:30

ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले असता वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले

Senior citizen dies in hit-and-run with speeding truck in Pune Drunk driver arrested | पुण्यात भरधाव ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; मद्यधुंद चालकाला अटक

पुण्यात भरधाव ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; मद्यधुंद चालकाला अटक

पुणे : भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलवरून जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना स्वारगेट येथील जेधे चौकात घडली. मद्यप्राशन करून ट्रक चालविलेल्या चालकाला अटक करण्यात आली.

विश्वनाथ शंकर साळुंखे (वय ६८, रा. जय भवानीनगर, जनता वसाहत, पर्वती पायथा) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. या प्रकरणी ट्रकचालक दत्तात्रय यादव मोरे (वय ३५, रा. चौखंडी, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) याला अटक करण्यात आली. याबाबत पोलिस कर्मचारी नेताजी वासुदेव यांनी स्वारगेटपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्वनाथ साळुंखे हे मंगळवारी (दि. २७ ) रात्री पावणेदहाच्या सुमारास स्वारगेट सायकलवरून केशवराव जेधे चौकातून निघाले होते. त्यावेळी भरधाव ट्रकची साळुंखे यांना धडक बसली. अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. ट्रक चालक मोेरे याला ताब्यात घेण्यात आले असता वैद्यकीय तपासणीत त्याने मद्यप्राशन केल्याचे उघडकीस आले. पोलिस उपनिरीक्षक कोतकर तपास करत आहेत.

Web Title : पुणे: ट्रक दुर्घटना में बुजुर्ग की मौत; नशे में चालक गिरफ्तार।

Web Summary : पुणे में, स्वारगेट के पास एक तेज रफ्तार ट्रक ने साइकिल सवार एक बुजुर्ग को टक्कर मार दी, जिससे उसकी मौत हो गई। नशे में ट्रक चालक को गिरफ्तार कर लिया गया है।

Web Title : Pune: Elderly man dies in truck accident; Drunk driver arrested.

Web Summary : In Pune, an elderly cyclist died after being hit by a speeding truck near Swargate. The intoxicated truck driver has been arrested by Swargate police.