गणित आॅलिम्पियाडमध्ये पुणेकर विद्यार्थ्यांची निवड

By Admin | Updated: May 27, 2014 06:55 IST2014-05-27T06:55:18+5:302014-05-27T06:55:18+5:30

आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या गणित आॅलिम्पियाड स्पर्धेमध्ये दोन पुणेकर विद्यार्थ्यांची निवड झाली

The selection of Puneer students in Mathematical Olympiad | गणित आॅलिम्पियाडमध्ये पुणेकर विद्यार्थ्यांची निवड

गणित आॅलिम्पियाडमध्ये पुणेकर विद्यार्थ्यांची निवड

पुणे : आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या गणित आॅलिम्पियाड स्पर्धेमध्ये दोन पुणेकर विद्यार्थ्यांची निवड झाली असून, देशभरातील सहा विद्यार्थी या स्पर्धेमध्ये आपली गणितीय बुद्धिमत्ता आजमावणार आहेत. या निवडीमुळे गेल्या २५ वर्षांचा पुणेकर विद्यार्थ्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागाची परंपरा कायम राहणार आहे. ही स्पर्धा १३ जुलै रोजी दक्षिण आफ्रि केत होणार आहे. भास्कराचार्य प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. वि. मा. सोलापूरकर, प्रा. किरण बर्वे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आॅलिम्पियाडसाठी निवड झालेले चैतन्य टप्पू, अनीश सेवेकरी या वेळी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय गणित आॅलिम्पियाड ही स्पर्धा १९५९ मध्ये सुरू झाली. भारत या स्पर्धेत १९८९ पासून सहभागी होत आहे. दरवर्षी जगभरातील ८५ देश या स्पर्धेत सहभागी होतात. यंदा या स्पर्धेसाठी पुण्यातून अनीश आणि चैतन्य यांची निवड झाली आहे. त्यांच्याबरोबर आणखी चार जण या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालचे सौमिक घोष, साग्निक साहा, सुप्रवत सरकार, ओरिसाचा जीत महापात्रा हे यामध्ये आपली क्षमता दाखविणार आहेत. त्यांना बंगळुरूमधील गणितज्ज्ञ बी.जे. वेंकटाचला, किरण बर्वे, पृथ्वीजीत डे, सोलापूरकर हे मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या विद्यार्थ्यांची निवड भारतीय गणित आॅलिम्पियाड स्तरावरून करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ५५ हजार विद्यार्थी सहभागी होतात. त्यामधून सहा जणांची निवड करण्यात येते. (प्रतिनिधी)

Web Title: The selection of Puneer students in Mathematical Olympiad