बालिका घरात एकटी असल्याचे पाहून केला अत्याचार; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल, शिरूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 16:37 IST2026-02-19T16:36:28+5:302026-02-19T16:37:07+5:30
डॉक्टरांनी बालिकेची तपासणी करत बालिकेवर अत्याचार झाल्याचे पालकांना सांगितल्यावर त्यांना धक्का बसला

बालिका घरात एकटी असल्याचे पाहून केला अत्याचार; अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल, शिरूर तालुक्यातील घटना
मलठण: कान्हूर मेसाई ता. शिरूर येथील आठ वर्षे बालिका घरासमोर खेळत असताना गावातील अल्पवयीन युवकाने बालिकेच्या घरात येत बालिका घरात एकटी असल्याचे पाहून तिच्यावर अत्याचार करत कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. मात्र सायंकाळी बालिकेला अचानक ताप आल्याने तिची प्रकृती संशयित वाटू लागल्याने पालकांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी बालिकेची तपासणी करत बालिकेवर अत्याचार झाल्याचे पालकांना सांगितले. यावेळी पालकांना धक्का बसल्याने पालकांनी बालिकेला विश्वासात घेत विचारपूस केली. बालिकेनी घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. याबाबत बालिकेच्या पालकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सदर अल्पवयीन युवकावर बाल लैंगिक अत्याचार सह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला तातडीने ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे व प्रतीक जगताप हे करत आहे.