शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
2
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
3
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
4
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
5
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
6
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
7
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
8
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
9
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
10
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
11
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
12
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
13
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
14
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
15
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
16
शनि अमावस्येच्या रात्री दोघांची हत्या; धुळ्यात भोंदू बाबाचं कृत्य, सगळं केलं पण एका चुकीने अडकला
17
क्रिकेटरशी जोडलं नाव, आता करोडपती यूट्युबरची बायको होणार 'ही' अभिनेत्री? लग्नाची रंगली चर्चा
18
मोठी कारवाई! TMCच्या कार्यालयावर छापे; सरकारी जमिनीची कागदपत्रे, १००हून अधिक आधार कार्ड जप्त
19
लोकसंख्या वाढीसाठी चंद्राबाबू नायडूं यांची मोठी घोषणा! तिसऱ्या आणि चौथ्या अपत्यासाठी सुरू केली 'कॅश ऑफर' योजना! कारण काय?
20
लातूर ते पुण्याची 'ती' बिल्डिंग... नीट पेपर फोडण्यासाठी विषयांची वाटणी, प्राध्यापिका CBIच्या ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 02:57 IST

देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आपले धोरण असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

पुणे : देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आपले धोरण असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पोलीस परिषदेत शनिवारी पंतप्रधान मोदी यांनी मार्गदर्शन केले़ पाषाण रस्त्यावरील ‘आयसर’च्या (भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधनसंस्था) आवारात देशांतर्गत सुरक्षेवर तीन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

तंत्रज्ञानातील बदलांवर तसेच देशांतर्गत सुरक्षेवर या परिषदेत चर्चा केली जात आहे़ गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शुक्रवारी परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते़ या परिषदेचा मुख्य विषय न्यायवैद्यकीय तपास आणि शास्त्रीय तपास असा आहे. शनिवारी पहिल्या सत्रात पंतप्रधान मोदी यांनी देशभरातील पोलीस महासंचालक तसेच तपास यंत्रणातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
तंत्रज्ञानातील बदल, त्याअनुंषगाने होणारा तपास, देशांतर्गत सुरक्षा तसेच दहशतवादी आणि नक्षलवादी कारवाया या विषयांवर मोदी यांनी

उपस्थितांना मार्गदर्शन केले. देशांतर्गत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार आहे. सीमेपलीकडील शत्रूकडून देशाअंतर्गत सुरक्षेला आव्हान देण्यात येत आहे. देशांतर्गत सुरक्षेबाबत तडजोड केली जाणार नसून आपल्या देशातील तपास यंत्रणा बाह्यआक्रमणे तसेच छुप्या कारवायांचे आव्हान पेलण्यास सक्षम असल्याचे मोदी म्हणाले. शनिवारी दिवसभर या परिषदेतील व्याख्याने मोदींनी लक्षपूर्वक ऐकली़
तीन दिवसांच्या परिषदेची सांगता रविवारी होईल. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सल्लागार अजित डोवाल, उपसल्लागार दत्ता पडसलगीकर, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख अरविंद कुमार यांच्यासह १८० पेक्षा अधिक वरिष्ठ अधिकारी परिषदेत सहभागी झाले आहेत.

राजभवन येथे राज्य सैनिक कल्याण विभागाच्या वतीने आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. मोदी यांनी शहीद जवान कुणाल गोसावी यांच्या वीरपत्नी उमा व मुलगी उमंग यांच्याशी यावेळी संवाद साधला. लेफ्टनंट कर्नल आर. आर. जाधव, नाईक नंदकुमार चावरे, सुभेदार संजय कुमार मोहिते, एनसीसी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.

नरेंद्र मोदी हे ‘फिटनेस’लाही तितकेच महत्त्व देतात. दिल्लीसह देशातील कोणत्याही राज्यात किंवा परदेश दौºयातही ते योगा व व्यायाम करण्यास विसरत नाहीत. ते शुक्रवारी पुण्यात मुक्कामी आले. त्यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी पहाटे योगा, ध्यानधारणा व हलकासा व्यायाम करण्यास प्राधान्य दिले. त्यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही योगासने केली. मोदी यांनी अधिकाºयांना योगाचे महत्त्व पटवून दिले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPuneपुणे