पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST2021-01-25T04:13:25+5:302021-01-25T04:13:25+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार न्यू कोपरे गावात घडला. ...

With a scythe attack on the youth out of prejudice | पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार न्यू कोपरे गावात घडला.

या प्रकारात अक्षय भाऊसाहेब चव्हाण (वय २४, रा. न्यू कोपरे गाव) यांनी उत्तमनगर फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाेलिसांनी चौघांच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून दिनेश किसन वांजळे व त्याच्या आईला अटक केली आहे. ही घटना न्यू कोपरे गावातील बेथशालम चर्चसमोर शुक्रवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

अक्षय याचा मित्र शुभम मानकर याच्यासोबत दिनेश वांजळे याची भांडणे झाली होती. त्यातूनच वांजळे याने शुभम याच्या घरी जावून शिवीगाळ केली. याबाबत यापूर्वी उत्तमनगर पोलीस ठाण्यात शुभमच्या आईने तक्रार दिली आहे. अक्षय हा दिनेशला समजावून सांगण्यासाठी त्याच्या घरी गेला होता. त्यावेळी दिनेशच्या आईने त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे ते त्यांच्या घरी निघून आले होते. त्यावरून अक्षयच्या घरी जावून दिनेश व त्याच्या आईने ‘तू काल आमच्या घरी का आला होता. तुला माज आला आहे का, तुला माहिती नाही का मी कोण आहे?’ असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपींनी अक्षय यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो चुकवण्यासाठी अक्षय खाली वाकला असता तो पाठीत लागल्याने गंभीर जखमी होऊन खाली पडला.

Web Title: With a scythe attack on the youth out of prejudice