शहरं
Join us  
Trending Stories
1
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
2
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
3
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
4
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
5
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
6
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
7
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
8
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
9
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
10
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
11
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
12
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
13
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
14
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
15
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
16
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
17
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
18
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
19
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: दीड वर्षांनी शाळांची घंटा वाजणार; लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षक, कर्मचा-यांनाचं शाळेत प्रवेश मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2021 19:51 IST

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश : अखेर ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार

ठळक मुद्देराज्य शासनाच्या वतीने केंद्राला पत्र पाठवून दोन डोस मधील अंतर कमी करणार

पुणे : पुण्यासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. पालकांसह संस्थाचालकांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या टाक्स फार्ससोबत चर्चा करून अखेर येत्या ४ ऑक्टोबर पासून इयत्ता पहिलीपासून सर्व वर्गांच्या शाळा, कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे लसीकरण पूर्ण असणे बंधनकारक आहे. या संदर्भात शिक्षण विभागाच्या वतीने स्वतंत्र व सविस्तर आदेश काढण्यात येतील असे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले. 

विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याची कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पवार यांनी वरील माहिती दिली. पवार यांनी सांगितले की, गणेशोत्सवनंतर कोरोना रुग्णांची संख्या कशी राहणार याबाबत येत्या १ ऑक्टोबरला आढावा घेण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोनाचे निर्बंध आणखी शिथिल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. जिल्ह्यात एक कोटी लोकांचा लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. याबाबत प्रशासन करत असल्या कामाबाबत आमदार-खासदारांनी समाधान व्यक्त केले आहे. तिस-या लाटेची देखील प्रशासनाची तयारी सुरू आहे.

लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांसाठी स्वीमिंग पूल खुले होणार 

सध्या खेळाडूसाठी सार्वजनिक स्वीमिंग पूल सुरू केले आहेत. यापुढे कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या सर्वच नागरिकांसाठी स्वीमिंग पूल खुले करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दोन डोसमधील अंतर कमी करण्यासाठी केंद्राला पत्र 

पुण्यासह संपूर्ण राज्यातच कोरोना लसीकरण चांगल्या प्रकारे सुरू आहे. परंतु सध्या पहिला डोस घेतल्यानंतर तब्बल ८४ दिवस थांबावे लागते, त्याशिवाय पुढील डोससाठी नोंदणीच होत नाही. आता लस उपलब्ध होत असल्याने राज्य शासनाच्या वतीने केंद्राला पत्र पाठवून दोन डोस मधील अंतर कमी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

विनामास्क फिरणा-यावर कडक कारवाई 

जिल्ह्यात रुग्ण संख्या कमी होत असल्याने आता बहुतेक निर्बंध शिथिल केले आहे. तसेच लसीकरण देखील चांगले झाले आहे. रुग्ण संख्या वाढीचा वेग खूपच कमी झाला आहे. ही परिस्थितीत अशी सुधारावी यासाठी मास्क वापरणे बंधनकारक आहेच. यामुळेच यापुढे विनामास्क फिरणा-यांवर अधिक कडक कारवाई करण्याच्या सूचना पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांना देण्यात आल्या असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा