सिंहगड रस्त्यावर स्कूल बसची पादचाऱ्याला धडक; जागीच मृत्यू, घटनास्थळावरून चालक पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 13:41 IST2025-12-09T13:40:54+5:302025-12-09T13:41:26+5:30
अपघातात संबंधित इसमाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता, त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू झाल्याचे घोषित केले.

सिंहगड रस्त्यावर स्कूल बसची पादचाऱ्याला धडक; जागीच मृत्यू, घटनास्थळावरून चालक पसार
पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर आज दुपारी १२:२० वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात एका पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. स्कूल बसने या व्यक्तीला धडक दिली. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. सिंहगड रोडवर वडगाव ब्रिजच्या दिशेने जाणाऱ्या इंद्रायणी स्कूलच्या बसने फन टाइम थिएटर समोरील रस्त्यावरून पायी जाणाऱ्या अज्ञात इसमास धडक दिली. धडक दिल्यानंतर बस चालक घटनेस्थळावरून पसार झाला.
या अपघातात संबंधित इसमाच्या डोक्याला गंभीर मार लागला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तात्काळ त्याला समोरील शरद हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत्यू झाल्याचे घोषित केले.दरम्यान, मृत इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, आरोपी चालक व संबंधित बसच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. सिंहगड पोलीस अधिक तपास करत आहेत.