शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘सौं’च्या तिकिटासाठी सरसावले पतीराज!

By admin | Updated: January 26, 2017 00:00 IST

शिक्रापूर-सणसवाडी गटात ‘महिलाराज’ येणार असल्याने राजकारणातील या भागातील दिग्गज नेत्यांची राजकीय गणिते बिघडली

शिक्रापूर : शिक्रापूर-सणसवाडी गटात ‘महिलाराज’ येणार असल्याने राजकारणातील या भागातील दिग्गज नेत्यांची राजकीय गणिते बिघडली असून, आता ‘पत्नीला’ राजकारणात उतरवण्याची जय्यत तयारी अनेकांनी केली आहे.मोठ्या प्रमाणावर कारखानदारी व विकासाच्या प्रवाहात मागील दहा वर्षांत पुणे-नगर रोडवरील शिक्रापूर गटाला शिरूरच्या राजकारणात व जिल्ह्याच्या राजकारणात चांगले स्थान प्राप्त झाले. फेररचनेने नव्याने तयार झालेल्या शिक्रापूर-सणसवाडी गटात जिल्हा परिषदेसाठी ओबीसी स्त्री, शिक्रापूर पंचायत समिती गणात इतर मागासवर्गीय महिला, तर सणसवाडी गणात सर्वसाधारण महिला आरक्षण निघाले. एकूण ३४०६९ मतदार असणाऱ्या या गटात मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे. भाजपाचे आमदार बाबूराव पाचर्णे व राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांच्या मतदारसंघातील या गटात शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी गटात मागील आठवडाभरात लक्ष केंद्रित केले असून, मोठी राजकीय खेळी येत्या काही दिवसांत या गटात पाहायला मिळणार आहे. पक्षीय राजकारणाच्या डावपेचात भाजपा, सेना व राष्ट्रवादी कॉँग्रेस-कॉँग्रेस यांच्यातील कुरघोडीचे राजकारण ‘पक्ष बदलाची’ समीकरणे पुढे येत असून, या भागातील जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती मंगलदास बांदल यांच्या राजकीय खेळीकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. या गटातील राजकीय घडामोडीचा परिणाम शिरूरच्या इतर गटांवरदेखील होणार असल्याने सर्व पक्षांच्या दिग्गज नेत्यांनी या गटाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यात अंतर्गत तडजोडी झाल्यास वेगळे चित्र येत्या काळात पाहावयास मिळणार असून भाजप व राष्ट्रवादीच्या गटात तणावपूर्वक शांतता या भागात दिसत आहे. शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील राजकीय उलथापालथ व राजकीय डावपेचात नवीन चेहरा शिक्रापूरचे उपसरपंच आबाराजे मांढरे यांनी या भागात राजकीय गणिते बदलण्यास भाग पाडले होते. त्याचा परिणाम येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत होईल, अशी चर्चा सध्या या भागात होत आहे. तर जाती-पातीच्या राजकारणात स्थानिक मतदारांबरोबर मोठ्या प्रमाणावर बाहेरील गावातील व जिल्ह्यातील कामगारवर्गाचे मतदान या गटात मोठ्या प्रमाणावर वाढले असून, त्यांची गोळाबेरीज काढताना इच्छुक उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे. (वार्ताहर)