शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संस्कार ग्रुपच्या कार्यालयाची तोडफोड

By admin | Updated: September 1, 2016 01:22 IST

वडमुखवाडी येथील संस्कार ग्रुपमध्ये महिला बचत गट महासंघाच्या माध्यमातून जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे

आळंदी : वडमुखवाडी येथील संस्कार ग्रुपमध्ये महिला बचत गट महासंघाच्या माध्यमातून जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. बुधवारी पाचशेहून अधिक महिलांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.सकाळी अकरापासूनच महिला एकत्रित आल्या व त्यांनी कार्यालयात येऊन गुंतवलेल्या पैशांची मागणी केली. मात्र, संस्थेतील कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने महिलांचा उद्रेक झाला. आळंदीसह पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांतील महिलांनी यात गुंतवणूक केली असल्याचे समोर येत आहे. वडमुखवाडीत संस्कार महिला बचत गट महासंघ आणि संस्कार ग्रुप आॅफ फायनान्सच्या नावाने गेल्या सात-आठ वर्षांत जादा व्याजाचे आमिष दाखवल्याने हजारो महिलांनी यात गुंतवणूक केली आहे. संस्थेने आजपर्यंत या महिलांना गेल्या पाच-सहा महिन्यांपासून परतावा देण्यासाठी केवळ तारखाच दिल्या. काहींना धनादेश दिले, तेही वटले नाहीत. दिघी पोलिसांच्या वतीने बंदोबस्तही मागविण्यात आला होता. या वेळी पोलीस आणि संस्थेतील काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करून संस्था पुढील १0 आॅक्टोबरपर्यंत सर्वांची देणी देईल, असे सांगितले. यावर काही महिलांनी वाट पाहण्याचा मार्ग अवलंबला. मात्र, काही महिलांचा उद्रेक कायम होता. त्यांनी संस्थेच्या गेटसमोर धरणे धरले. त्यानंतरही उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने आक्रमक महिलांनी तोडफोडही केली.दरम्यान पिंपरी-चिंचवडमध्येही अनेक जणांची फसवणूक झाली आहे. पैसे परत मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक हवालदिल झाले आहेत. वेगवेगळ्या बोगस वित्तीय संस्थांची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.(वार्ताहर)